मुंबई, : दक्षिण आशियातील सर्वात मोठा LGBTQIA+ चित्रपट महोत्सव, ‘कशिश’ मुंबई इंटरनॅशनल क्विअर फिल्म फेस्टीव्हलची 14 वी आवृत्ती, 7 जून ते 11 जून 2023 या कालावधीत लिबर्टी सिनेमा येथे इन-पर्सन साजरी केली जाईल, पुढील आठवड्यात ऑनलाइन महोत्सवादेखील रंगणार आहे.
कशिश 2023 ची संकल्पना ‘बी फ्लुइड, बी यू!’ आहे, जी समकालीन पिढीच्या आकांक्षांना पंख देते. त्यांचे विचार, कृती आणि लैंगिकतेमध्ये तरल आहेत; जे चित्रपट, कला आणि कवितेतून व्यक्त होतात व त्याचे आवाहन सार्वत्रिक आहे.
महोत्सवाचे संचालक श्रीधर रंगायन आणि कार्यक्रम संचालक सागर गुप्ता यांनी आयोजित पत्रकार परिषदेला आदरणीय सल्लागार मंडळ, नॅरेटिव्ह फिल्म्स ज्युरी स्टुडंट्स शॉर्ट ज्युरी आणि डॉक्युमेंटरी फिल्म ज्युरी उपस्थित होते.
सल्लागार मंडळाच्या सदस्या अरुणाराजे पाटील म्हणाल्या, “मला दरवर्षी कशिशला भेट द्यायला आवडेल. चित्रपट महोत्सव म्हणून कशिश ही एक मोठी चळवळ आहे!” तर डॉली ठाकोर म्हणाल्या, “मी स्वतः अनेक मान्यवर व्यक्तींशी बोलले आहे. त्यांनी प्रकाशात आल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. प्रगतीचा वेग मंद आहे, पण ती नक्कीच होईल.” चित्रपट निर्माते ओनीर म्हणाले, “मुख्य प्रवाहातील आणखी व्यक्तिरेखा पुढे येऊन कशिशला पाठिंबा देतील अशी माझी इच्छा आहे. जागतिक LGBQTIA+ सिनेमाला मुख्य प्रवाहात आणून श्रीधर आणि सागर प्रशंसनीय कार्य करत आहेत.”
नॅरेटिव्ह फिल्म्स विभागातील ज्युरीनी चर्चा केली, लिलयट दुबे म्हणाल्या, “या विभागातील प्रवेश डोळ्यात अंजन घालणारे होते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मी हेलावून गेले.” तर अभिनेता अनुप सोनी म्हणाला, “नॅरेटिव्ह फिल्म्स ज्युरीचा भाग होण्याची संधी म्हणजे मला शिकण्याची संधी मिळाल्याप्रमाणे आहे. मला एक चांगला माणूस झाल्याची जाणीव होतेय.” चित्रपट निर्माते जितिन हिंगोरानी म्हणाले, “माझा भारतीय चित्रपट महोत्सवाशी पहिल्यांदाच संबंध आला आहे. मला सिनेमा पाहून भारतीय-अमेरिकन म्हणून अभिमान वाटला.”
डॉक्युमेंटरी फिल्म्स ज्युरीचे सदस्य यंदा कशिशचा भाग झाल्याबद्दल आनंदी होते. “सिनेमे आपल्याला खूप काही शिकवतात. कशिशचा भाग होण्याची दुसऱ्यांदा संधी मिळणे हा माझा सन्मान समजतो,” असं डॉक्युमेंटरी निर्माते नंदन सक्सेना यांनी सांगितले. तर आंचल कपूर म्हणाली, “माझ्या फिल्म क्लबमध्ये मी प्रदर्शित केलेला पहिला चित्रपट श्रीधरचा ‘गुलाबी आईना’ होता. प्राईड मंथच्या पूर्वसंध्येला कशिशमध्ये असणे माझ्यासाठी खास आहे.” तर चित्रपट निर्माते शांती भूषण रॉय म्हणाले, “जर आपण लोकांचे LGBTQIA+ असे वर्गीकरण केले, तर आपण माणसे म्हणून अपयशी असू. कशिशमधील माहितीपट वेदना, प्रेमाची तळमळ, इच्छा दर्शवतात.”
स्टुडंट्स शॉर्ट ज्युरीच्या सदस्यांचे मत मांडताना रुचा पाठक म्हणाल्या, “माझ्यासाठी कशिश खास आहे. आवाज वाढेल आणि संरक्षित वातावरण निर्माण होईल.” तर पटकथा लेखिका अतिका चोहान म्हणाल्या, “कशिश हे बाळपणातील घरासारखं आहे. मुंबई शहराच्या प्रत्येक गोष्टीचे ते रूपक आहे.” समर्थ महाजन पुढे म्हणाले, “स्टुडंट्स शॉर्ट फिल्म कॅटेगरीतील हे सिनेमे भविष्यातील प्रतिध्वनी आहेत. मला कशिशचे वातावरण आवडते. कारण मी संपर्क जोडू शकतो आणि अधिक प्रगती साधू शकतो.”