मुंबई, १ जून २०२३: ऑनलाइन फॅशन बाजारपेठेत काहीतरी अद्वितीय पाहायला मिळणार आहे. कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (‘केएमबीएल’/कोटक) भारतातील अग्रगण्य फॅशन, ब्युटी व जीवनशैली गंतव्य मिंत्रासोबत सहयोगाने आज अद्वितीय को-ब्रॅण्डेड डिजिटल फॅशन व लाइफस्टाइल क्रेडिट कार्डच्या लाँचची घोषणा केली.
अनेक फायदे देणारे को-ब्रॅण्डेड कोटक मिंत्रा क्रेडिट कार्ड फॅशनप्रेमी ग्राहकांना अमर्यादित व्यवहारांच्या माध्यमातून त्यांच्या बचतींवर उत्तम मूल्य अनलॉक करण्यास सक्षम करेल. मिंत्रा, तसेच कोटक मोबाइल अॅप्लीकेशन्समध्ये काही मिनिटांमध्येच विनासायास डिजिटल प्रवासाच्या माध्यमातून या कार्डचा लाभ घेऊ शकतात. विद्यमान मिंत्रा ग्राहक मिंत्रा अॅपवरील पूर्णत: डिजिटल प्रवासाच्या माध्यमातून कार्डसाठी अर्ज करू शकतात.
कोटक मिंत्रा क्रेडिट कार्ड मास्टरकार्ड व रूपे नेटवर्कवर उपलब्ध असेल.
कोटक महिंद्रा बँक लि.च्या क्रेडिट कार्डसचे व्यवसाय प्रमुख फ्रेड्रिक डिसूझा म्हणाले, ‘‘मिंत्रा म्हणजे सर्वोत्तम फॅशन व ग्राहक अनुभवाची खात्री. आम्हाला सूक्ष्मदर्शी फॅशनप्रेमींना हे अद्वितीय उत्पादन प्रदान करण्याकरिता मिंत्रासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आमचा सहयोग म्हणजे ग्राहक आनंद व विश्वासाची संगत आहे. हे क्रेडिट कार्ड आमच्या लक्ष्य ग्राहकांच्या जीवनशैली व फॅशन शॉपिंग सवयींकरिता निर्माण केलेले विशेषाधिकार व अद्वितीय फायद्यांसह डिझाइन करण्यात आले आहे. आम्ही त्यांच्या क्रेडिट गरजांची पूर्तता करण्याप्रती, तसेच अद्वितीय सेवा देण्याप्रती कटिबद्ध आहोत.’’
को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड फॅशनेबल व आधुनिक काळातील ग्राहकांना त्यांच्या फॅशन गरजांसाठी योग्य निवड देण्याच्या मनसुब्यासह डिझाइन करण्यात आले आहे. या कार्डचा भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या फॅशन ई-कॉमर्स बाजारपेठेत प्रवेश करण्याचा देखील मनसुबा आहे. ही बाजारपेठ व्यापक संधी देते. फॅशन ई-कॉमर्समधील विकासाचे नेतृत्व डिजिटलप्रेमी ग्राहकांकडून करण्यात येईल, ज्यामध्ये मिलेनियल्स, तसेच जनरेशन झेड ग्राहक विभागांचा समावेश असेल.
मिंत्राच्या पार्टनरशिप्स अॅण्ड मोनेटायझेशनचे उपाध्यक्ष संतोष केवलानी म्हणाले, ‘‘उद्योगातील अद्वितीय कार्ड असलेले मिंत्रा को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड मेट्रो, प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील फॅशन खरेदीदारांप्रती समर्पित असेल, ज्यामधून स्थिर व सर्वोत्तम ब्रॅण्ड आवाहन करण्यात येईल. या सहयोगासह आमचा ग्राहकांना अद्वितीय व लाभदायी पेमेंट पर्याय प्रदान करत मिंत्रावरील त्यांचा शॉपिंग अनुभव वाढवण्याचा मनसुबा आहे. कोटक महिंद्रा बँक भारतातील सर्वात मोठ्या व सर्वात विश्वसनीय आर्थिक संस्थांपैकी एक आहे आणि प्रगतीशील सहयेागी बँक असण्याची त्यांची स्थिती अग्रणी असून आमच्यासारख्या ब्रॅण्डशी उत्तमरित्या संलग्न आहे. आम्हाला विश्वास आहे की, हा सहयोग आम्हाला ग्राहकांना एकसंधी व लाभदायी शॉपिंग अनुभव देण्यासोबत त्यांच्या खरेदीवर अधिक बचत करण्यास सक्षम करण्यामध्ये मदत करेल.’’
मास्टरकार्डचे दक्षिण आशियामधील डिजिटल पार्टनरशिप्सचे उपाध्यक्ष आदित्य मूर्ती म्हणाले, ‘‘मास्टरकार्डला नवीन फॅशन ट्रेण्ड्ससह अद्ययावत राहण्याची आवड असलेल्या ग्राहकांकरिता अद्वितीय तत्त्व सादर करण्यासाठी कोटक महिंद्रा बँक व मिंत्रासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. कोटक मिंत्रा क्रेडिट कार्ड फॅशन व जीवनशैली क्षेत्रातील गेम-चेंजर आहे, जे मिंत्रावर व्यापक कलेक्शनची खरेदी करण्यास आवडणाऱ्या ग्राहकांना अद्वितीय फायदे देते.’’
एनपीसीआय येथील कॉर्पोरेट अॅण्ड फिनटक रिलेशनशिप्स व प्रमुख उपक्रमांचे प्रमुख श्री. नलिन बंसल म्हणाले, ‘‘आम्हाला प्रबळ रूपे नेटवर्कवर मिंत्रा कोटक को-ब्रॅण्डेड कार्ड लाँच करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. यूपीआयवर रूपे क्रेडिट कार्डच्या आमच्या तत्त्वासह आम्हाला विश्वास आहे की आमचा सहयोग या कार्डच्या वापरकर्त्यांना सुरक्षित, आनंददायी व लाभदायी शॉपिंग अनुभव देईल.’’
कार्डस् कार्यान्वित करणाऱ्या सर्व कार्डधारकांना मिंत्राचा लॉयल्टी प्रोग्राम – मिंत्रा इनसाइडरवर ऑनबोर्ड करण्यात येईल, तसेच कॉम्प्लीमेण्टरी म्हणून ५०० रूपयांचे ई-वाऊचर मिळेल. मिंत्रा अॅप, सोशल ते डिजिटल व्यासपीठ, कोटक महिंद्रा बँकेच्या डिजिटल अॅसेट्स, तसेच इतर ऑफलाइन मार्केटिंग चॅनेल्स अशा विविध टचपॉइण्ट्सवर कार्डचा प्रचार करण्यात येईल.
या अद्वितीय क्रेडिट कार्डसाठी जॉइनिंग शुल्क व वार्षिक फी फक्त ५०० रूपये आहे.
कार्डबाबत अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा (click here.).