ब्रॅण्ड संदेश #GreatSleepGreatHealth मध्ये वाढ
भारतातील पहिली तंत्रज्ञान सक्षम मजबूत अॅडजस्टेल मॅट्रेस न्यूमाचे अनावरण
MUMBAI : ड्युरोफ्लेक्स या भारतातील अग्रगण्य स्लीप सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने दीर्घकालीन आरोग्यदायी जीवनाला चालना देण्यामध्ये दर्जेदार झोपेचे महत्त्व सांगण्याच्या त्यांच्या मिशनला अधिक पुढे घेऊन जाण्यासाठी क्रिकेट आयकॉन विराट कोहलीसोबत सहयोग केला आहे. विराट कोहलीची ब्रॅण्डच्या मिशनसोबतच्या दृढ संलग्नतेमुळे ड्युरोफ्लेक्ससाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. हा प्रबळ सहयोग एकूण आरोग्यामध्ये सुधारणा करण्यात दर्जेदार झोपेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत संवादाची देवाणघेवाण करण्यास, तसेच अधिकाधिक ग्राहकांपर्यंत या संदेशाचा प्रसार करणार आहे.
विराट कोहलीसोबत सहयोग करत ड्युरोफ्लेक्स दर्जेदार झोपेबाबत आणि सानुकूल आरोग्यामध्ये झोपेच्या अपरिहार्य भूमिकेबाबत संवादामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. हा सहयोग ड्युरोफ्लेक्सची दर्जेदार झोप व आरोग्यदायी, अधिक उत्साहवर्धक जीवन यांमधील दुव्याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याप्रती असलेली अद्वितीय कटिबद्धता दाखवेल. क्रीडा व फिटनेस युगामधील प्रख्यात विराट कोहलीचा ड्युरोफ्लेक्ससोबतचा सहयोग अधिकाधिक ग्राहकांपर्यंत दर्जेदार झोपेचा संदेश प्रसारित करण्याची, तसेच व्यक्तींना भावी आरोग्यासाठी त्यांच्या झोपेला प्राधान्य देण्यास प्रेरित करण्याची अपेक्षा आहे. ही घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली, ज्यावेळी ड्युरोफ्लेक्सचे सीएमडी व स्लीप एवॅन्गेलिस्ट मॅथ्यू चँडी आणि ड्युरोफ्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहनराज जे. उपस्थित होते.
ड्युरोफ्लेक्सचा चेहरा बनण्याबाबत आपले मत व्यक्त करत विराट कोहली म्हणाला, ‘‘प्रोफेशनल अॅथलीट म्हणून मला शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यामध्ये झोप व रिकव्हरीचे महत्त्व माहित आहे. माझा ठाम विश्वास आहे की, दर्जेदार झोपेला प्राधान्य दिल्यास तुमचे व तुमच्या प्रियजनांचे जीवन आरोग्यदायी व अधिक समाधानकारक होऊ शकते. फक्त काही तासांसाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे नसून झोपेचा दर्जा देखील महत्त्वाचा आहे. मी उत्तम दर्जेदार झोप मिळण्याची खात्री घेतो. ड्युरोफ्लेक्सची दीर्घकालीन, आरोग्यदायी जीवनासाठी दर्जेदार झोपेच्या महत्त्वाला चालना देण्याप्रती कटिबद्धता माझ्या वैयक्तिक विश्वासांशी संलग्न आहे. ब्रॅण्डचा चेहरा बनणे माझ्यासाठी स्वाभाविक होते, जेथे माझा ब्रॅण्डच्या मिशनवर विश्वास आहे. मी ब्रॅण्डमध्ये नवीन आकारमानाची भर करण्यास आणि दीर्घकालीन, आरोग्यदायी व दर्जेदार जीवनासाठी उत्तम झोप मिळण्याचा संदेश प्रसारित करण्यास उत्सुक आहे.’’