मुंबई – फेडरल बँकेचे अंबरनाथ येथे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे.अंबरनाथला A7-10 नाना पाटील प्राईड जुन्या पोलिस स्टेशनसमोर कोहोजगाव येथे फेडरल बँकेचा नव्या शाखेच्या प्रारंभ झाला आहे. उदघाटनाला घटनास्थळी अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री राजेश अग्रवाल, चीफ जनरल यांच्या हस्ते बँकेचा प्रांगणात उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी श्री एस एम साळवे जनरल मॅनेजर (HR,Admin),MPF( Unit of Armoured Vechiles Nigam Ltd ) ,भारत सरकार यांच्या हस्ते बँकेचा एटीएमचे आणि श्री एम एपी अजयकुमार व्यवस्थापकीय संचालक Unico Infra Engineers Pvt Ltd यांच्या हस्ते बँकेचा स्ट्रॉगरुमचे उद्घाटन करण्यात आले.श्री प्रदीप पाटील मैनेजिंग पार्टनर Patil Builders And Developers यांनी बँकेचा लॉकरचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री महेश आर Senior Vice President and Zonal Head Mumbai अध्यक्षपदी होते.
स्टेट ऑफ आर्ट तंत्रज्ञान, अत्याधुनिक सुसज्ज पायाभूत सुविधा, ग्राहकांसाठी आकर्षक वातावरण निर्मिती युक्त या सुविधेचा विचार करूनच बँकेची रचना करण्यात आली आहे. बँकिंग सेवांचा बरोबरीनेच बँकेने लॉकरसह इतर अनेक सुविधा उपलब्ध या शाखेत उपलब्ध होणार आहेत. स्थानिकांचा विचार देखील विचार सुविधा पुरवताना विचार केला गेला आहे. स्थानिक पातळीवर सर्वसामान्य नागरिक, व्यक्ती, व्यवसायिक, उद्योगपती या सगळ्या समाजघटकांचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येक ग्राहकाची नेमकी गरज ओळखून उत्तम दर्जाचा व्यक्तिगत सेवा देण्यावर बँकेचा भर राहील.
याप्रसंगी श्री महेश आर Senior Vice President and Zonal Head फेडरल बँक मुंबई म्हणाले, आम्हाला अंबरनाथ येथील नवीन शाखेचे उद्घाटन करण्यास अत्यंत आनंद होत आहे.यापुढेही नवी मुंबई प्रभागात बँकचे कार्यकक्ष रूंदावून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊन आपुलकीचे नाते निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’
फेडरल बँक बँकिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाअधिक सद्यस्थितीत ग्राहकांना सुलभ सेवा देण्यावर भर राहील तसेच ग्राहक आपले खात्याचा डिजिटल चॅनेल मार्फत कधीही सोयीनुसार व्यवहार करू शकतील.फेडरल बँक रिटेल, कॉर्पोरेट, ट्रेझरी आणि व्यक्तिगत गरजेनुसार डिझाईन केलेल्या आमच्या सेवेचा लाभ ग्राहक आपल्या आर्थिक गरजांसाठी निःसंकोचपणे करू शकतील.’ असे उद्गार त्यांनी काढले.