NHI/MUMBAI
पार्क क्लब व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेतील ८ वर्षाखालील मुलांमध्ये ओम गणू व मुलींमध्ये आश्वी अगरवाल तर १० वर्षाखालील मुलांमध्ये नक्ष मलिक व भावा प्रनिथा यांनी विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार्क क्लबच्या चेअरपर्सन वरदा चुरी, पी.व्ही. देसाई, दीपक पंडित, तुषार वगळ, राजाबाबू गजेंगी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
महाराष्ट्र दिन बुध्दिबळ स्पर्धेतील ८ वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये ओम गणूने (४.५ गुण) प्रथम, कृष्णाव दर्यानानीने (४.५ गुण) द्वितीय, अहान कातारुकाने (४ गुण) तृतीय, आरिष गांधीने (४ गुण) चौथा, विवान कदमने (४ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आश्वी अगरवालने (३.५ गुण) प्रथम, गिरीशा पैने (३ गुण) द्वितीय, थिया वागळेने (३ गुण) तृतीय, सर्वा परेलकरने (३ गुण) चौथा, अनिश्का बियाणीने (३ गुण) पाचवा क्रमांक पटकाविला. १० वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित नक्ष मलिकने (५ गुण) प्रथम, मनोमय शिंगटेने (४ गुण) द्वितीय, निस्चीथ नाईकने (४ गुण) तृतीय, श्लोक परोनिगरने (४ गुण) चतुर्थ, साईश ठाकूरने (४ गुण) पाचवा तर मुलींमध्ये भावा प्रनिथाने (३ गुण) प्रथम, गिरीजा लाब्रेने (२ गुण) द्वितीय, साईशा मुळेने (२ गुण) तृतीय, समृध्दी जोशीने (२ गुण) चौथा, त्विशा मेहताने (२ गुण ) पाचवा क्रमांक मिळविला.