मुंबई, : “देशाची ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी इंधन बचत ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन इंधन बचतीसाठी सर्वच स्तरांवर जनजागृती होणे गरजेचे आहे”, असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर व्हावा, यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम, नैसर्गिक मंत्रालय आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३ )चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.
यावेळी बीपीसीएलचे कार्यकारी संचालक अनिलकुमार पी, इंडियन ऑइलचे प्रादेशिक व्यवस्थापक अजित धक्रास, राजीव श्रेष्टा, एचपीसीएलचे व्यवस्थापक अकेला वि.ऐन.एस. के. लक्ष्मणराव, गेलचे व्यवस्थापक शंतनू बासू, पीसीआरएचे अधिकारी उपस्थित होते.