मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात अनेक अनेक दिग्गज नगरसेवकांना धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतले विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा वॉर्ड महिला आरक्षित झाला आहे.
तर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांचा प्रभागद 109 हा सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे. याशिवाय शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड OBC आरक्षित झाला आहे.
आज 219 प्रभागांच्या आरक्षणाची आज लॉटरी काढण्यात आली. या पैकी 63 प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी 32 वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित आहेत.
कोणते प्रभाग ओबीसी आरक्षित
3, 7, 9, 12, 13, 16, 17, 27, 30, 38, 40, 42, 48, 51, 53, 61, 62, 73, 76, 79, 81, 82, 87, 89, 96, 98, 101, 110, 117, 127, 128, 129, 130, 132, 135, 137, 146, 147, 148, 150, 152, 154, 155, 159, 161, 164, 173, 174, 179, 180, 183, 185, 188, 195, 200, 202, 203, 217, 218, 222, 223, 230, 236