क्रेडाई इन्व्हेस्टचर सेरेमनी येथे सहयोगाची घोषणा: श्री. बोमण इराणी यांची २०२३-२०२५ साठी क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष म्हणून निवड
• श्री. डॉमनिक रोमेल यांची क्रेडाई एमसीएचआयची अध्यक्ष म्हणून नवीन पदभाराची सुरूवात; एमएमआर रिएल्टी मंडळाकडून त्यांचा सस्टेनेबिलिटी पार्टनर म्हणून ‘स्मार्टर धर्मा’ची घोषणा
मुंबई, : भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट बॉडी कॉन्फडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ने आज क्रेडाईच्या नियुक्ती (इन्वहेस्टचर) समारोहाप्रसंगी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) सोबत देशव्यापी सहयोगाची घोषणा केली. श्री. बोमण इराणी यांची पुढील २ वर्षांसाठी क्रेडाई नॅशनलचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच क्रेडाई एमसीएचआयने नेतृत्वामध्ये बदलाची घोषणा केली, जेथे श्री. डॉमनिक रोमेल यांची मुंबई महानगर प्रदेशातील रिअॅल्टी बॉडीसाठी नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आयजीबीसीसोबतच्या सहयोगांतर्गत क्रेडाईने आयजीबीसी ग्रीन अॅण्ड नेट झीरो बिल्डिंग रेटिंग्जच्या अवलंबतेच्या माध्यमातून भारतभरात पुढील २ वर्षांमध्ये १००० हून अधिक सर्टिफाईड हरित प्रकल्पांचे आणि २०३० पर्यंत ४००० प्रकल्पांचे बांधकाम करण्याचा संकल्प कला आहे.
यामुळे देशभरातील हरित विकास श्रेणीत ४,००,००० हून अधिक गृहनिर्माण सदनिकांची भर होईल. हे प्रकल्प आयजीबीसीद्वारे प्रमाणित केले जातील आणि हरित विकासाच्या नवीन युगाची सुरूवात करतील, हजारो रिअल इस्टेट विकासकांना प्रेरणा देतील, जेथे क्रेडाई देशव्यापी ग्रीन बिल्डिंग चळवळीचे नेतृत्व करत आहे.
शाश्वत विकासाची सुरूवात करत श्री. बोमण इराणी म्हणाले, क्रेडाई नॅशनलचा भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वसमावेशक, सर्वांगीण विकासाला पूरक असे प्रबळ व्यासपीठ निर्माण करण्याचा मनसुबा आहे.
भारतभरातील शाश्वत विकासासाठी उद्योग मानक स्थापित करण्यासाठी ओळखला जाणारा क्रेडाईचा आयजीबीसीसोबतचा सहयोग आवश्यक माहिती देईल आणि क्रेडाई विकासकांच्या ‘बिल्ड बेटर’प्रती क्षमतांना प्रबळ करेल. क्रेडाईच्या २०३० पर्यंत कार्बनचे प्रमाण कमी करण्याच्या आणि २०५० पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी संपादित करण्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याप्रती विस्तार म्हणून याबाबत रोडमॅप तयार करण्यावर अधिक भर देण्यात येईल आणि क्रेडाईला देशाच्या २०७० पर्यंत निव्वळ शून्यपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीकोनाशी संलग्न करते.
याप्रसंगी श्री. बोमण इराणी यांनी क्रेडाई नॅशनल व त्यांच्या सर्व चॅप्टर्सना सुविधा देण्याकरिता एकाच मिशनमध्ये एकीकृत करणाऱ्या जी.आर.ओ.डब्ल्यू.टी.एच. च्या (ग्रोथ) नॅशनल व्हिजनला देखील लॉन्च केले.
जी: ग्रीन कन्सट्रक्शन (हरित बांधकाम)
आर: रिफॉर्म (सुधारणा)
ओ: ऑपोच्युर्निटी टू बिल्ड न्यू इंडिया (नवीन भारताच्या निर्माणासाठी संधी)
डब्ल्यू: विमेन एम्पॉवरमेंट (महिला सक्षमीकरण)
टी: ट्रान्सपरन्सी (पारदर्शकता)
एच: हाऊसिंग फॉर ऑल (सर्वांसाठी घरे)
क्रेडाई एमसीएचआयने अग्रगण्य रिअल इस्टेट सस्टेनेबिलिटी कन्सल्टंट ‘स्मार्टर धर्मा’सोबत देखील सहयोग आहे. ही कपंनी मुंबई महानगर प्रदेशासाठी शाश्वत भागीदार आहे.
क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष श्री. बोमण इराणी आपले मत व्यक्त करत म्हणाले, ‘‘क्रेडाई नॅशनलचा नवीन अध्यक्ष बनणे माझ्यासाठी सन्माननीय आहे आणि यामधून माझ्या पूर्वीच्या निपुण व्क्तींनी संपादित केलेले असाधारण काम व उपलब्धींना पुढे घेऊन जाण्याची संधी आहे.
भारतीय रिअल इस्टेट क्रांतीच्या टप्प्यावर आहे आणि क्रेडाईमध्ये आम्ही सहभागी सर्व भागधारकांसाठी विकसाला चालना देण्यास अत्यंत उत्सुक आहोत.
गृहखरेदीदार व सहायक उद्योगांसाठी संपूर्ण पारदर्शकता आणि प्रशासन मानके वाढवताना शाश्वत क्षेत्रीय वाढ सक्षम करणारी अधिक अनुकूल इको-सिस्टम सुनिश्चित करण्यासाठी सरकारसोबत काम करणे सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे.
एक प्रतिष्ठित उद्योग संस्था म्हणून आम्हाला पार पाडणाऱ्या जबाबदाऱ्या माहित आहेत आणि आम्ही या क्षेत्राला सर्वसमावेशक व शाश्वत वाढीच्या नवीन युगात नेण्याची आशा करतो. हे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने आम्ही आमचे ‘बेटर बिल्डिंग्स, बिल्डिंग बेटर’ तत्त्व संपादित करण्याकरिता आयजीबीसीसोबत सहयोग केला आहे. हे तत्त्व विकासकांना शाश्वतपणे बांधकाम करण्यासाठी दीर्घकाळापर्यंत सक्षम करेल.’’
क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष श्री. डॉमनिक रोमेल म्हणाले, ‘‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हे देशातील बहुमूल्य मालमत्ता बाजारांपैकी एक आहे, जे राज्य व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत मुख्य योगदान देते.
क्रेडाई-एमसीएचआय उत्तम प्रशासन, गृहनिर्माण धोरणांमध्ये सुधारणा, एमएमआरमध्ये निव्वळ कार्बन पद्धतींचे सानुकूल याप्रती काम करत राहिल. क्रेडाई एमसीएचआरने गतकाळात सक्षम नेतृत्वांतर्गत नवीन उंची गाठल्या आहेत आणिइपायाभूत सुविधा व रिअल इस्टेटमध्ये वाढ होत असताना उद्योगासाठी हा वारसा पुढे नेण्याचा मला खूप आनंद होत आहे. एमएमआर रिअल इस्टेटमधील शाश्वततेचे महत्त्व वाढवण्याच्या दिशेने केंद्रित काम करून आम्ही नवीन युगात प्रवेश करत आहोत.’’
क्रेडाई नॅशनलचे माजी अध्यक्ष श्री. हर्ष वर्धन पतोडिया म्हणाले, ‘‘गेल्या २४ वर्षांमध्ये क्रेडाईने अग्रगण्य उद्योग संस्था म्हणून आपले स्थान यशस्वीरित्या प्रस्थापित केले आहे आणि आम्हाला क्रेडाईसह भारतीय रिअल इस्टेट उद्योगाला शाश्वतता व पादर्शकतेच्या माध्यमातून नव्या उंचीवर नेण्याच्या बोमण यांच्या दृष्टीकोनाबाबत आशा व विश्वास आहे.’’