NHI/ –भास्कर कोर्लेकर
शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा नेमळेकर लवकरच एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे. येत्या 12 मेला प्रदर्शित होणाऱ्या “रावरंभा” या ऐतिहासिक चित्रपटात अपूर्वा शाहीन आपा ही भूमिका साकारत आहे.
शिवछत्रपतींच्या कार्यात छुपी मदत करणारी शाहीन आपा ही अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना, अपूर्वा सांगते ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी शाहीन आपा या व्यक्तिरेखेमुळे मला मिळाली आहे. ही भूमिका प्रेक्षकांना निश्चित आवडेल. या व्यक्तिरेखेमुळे मला स्वतःला काही वेगळं करण्याचं समाधान दिलं आहे.
निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे “रावरंभा” ही प्रेम कहानी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांची असून छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. अजित भोसले व संजय जगदाळे सहनिर्माते तर महेश भारांबे व अन्वय नायकोडी कार्यकारी निर्माते आहेत. प्रशांत नलावडे निर्मिती व्यवस्थापक असून गीतकार गुरु ठाकूर व क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमित राज यांनी संगीतबद्ध केले आहे.