मुंबई : अगदी लहानपणापासून जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला नेहमीच आपले हात स्वच्छ धुण्यासाठी सांगण्यात आले आहे. शिक्षक, पालक, मोठ्या व्यक्ती, भावंडं अगदी प्रत्येकाने आपण कामावरून घरी आल्यानंतर अथवा बाहेरून घरी आल्यावर जेवण्यापूर्वी हात धुण्याचाच सल्ला दिला. सततच्या या सल्ल्याने आपण चिडलोदेखील. पण सांगण्याप्रमाणे वागलोसुद्धा.
त्यानंतर COVID – 19 साथीच्या आजाराच्या वाढीमुळे संसर्ग कमी करण्यासाठी योग्य हात धुण्याची गरज, महत्त्व आणि त्याचे नक्की काय परिणाम होतात हे दिसून आले. युनिसेफच्या म्हणण्यानुसार, फक्त आपले हात धुण्याने ३६% कोविड-१९ च्या संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे हात धुण्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत जनमानसात वर्तणुकीत बदल झालेला दिसून आला आहे.
हात स्वच्छतेच्या या मोहिमेला चालना देण्यासाठी जगभरातील शासनाने सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर्स असणे अनिवार्य केले असून लोकांनी COVID – 19 साथीच्या प्रतिबंधासाठी हात धुण्याची योग्य सवय मुख्यत्वे त्यांच्या दैनंदिन व्यवहारात समाविष्ट करून घेतली. जसजसे COVID – 19 चे नियम शिथील झाले तसतसे लोक पुन्हा आपल्या हात वारंवार न धुण्याच्या अथवा हाताच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्याच्या जुन्या सवयींकडे वळलेले दिसून येत आहेत.
COVID – 19 नियंत्रणात आला असला तरीही साथीच्या या आजारानंतर अनेक संसर्गजन्य रोगांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये अतिसार, ताप, डोळ्यांचे आजार, कॉलरा, न्यूमोनिया अशा अनेक आजारांचा समावेश असून हे आजार विषाणू आणि जीवाणूंमुळे पसरतात आणि हे हाताच्या अस्वच्छतेमुळे शरीरात पसरत आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा लोकांना हात धुण्याच्या सवयीचे आठवण करून द्यायला हवे वाटत असल्याने, ITC ने लोकांना आता हाताच्या स्वच्छतेबाबत शिक्षण देण्यासाठी एक उपक्रम राबवला असून ‘द हँड’ असे याचे नाव आहे. म्हणजे नेमके काय? तर ITC च्या सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मोहिममध्ये देशातील सर्वोत्तम क्रिकेटर्सपैकी एक असणाऱ्या सचिन तेंडुलकरसह हातमिळवणी केली आहे. मजेदार आणि खिलाडी वृत्तीने देशातील लोकांना हात धुण्याची आठवण करून देण्यासाठी सचिन तेंडुलकरला जगातील पहिला ‘हँड अॅम्बेसिडर’ म्हणून सहभागी करून घेण्यात आले आहे.
खरेच, हात धुण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारतात ज्या खेळाला धर्म मानला जातो अशा खेळातील दिग्गजाचा हातभार लागला त्यापैक्षा अधिक चांगले काय असू शकते? या वैशिष्ट्यपूर्ण मोहिमेचा एक भाग म्हणून, निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचा संदेश पसरविण्यासह सचिननेही आता हातमिळवणी केली आहे.
होय! तुम्ही योग्य वाचले आहे. तुम्हीदेखील सचिनसह इथे हातमिळवणी करू शकता, पण त्याआधी तुम्ही नियमितपणे तुमचे हात धुण्याची आणि दुसऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहन देण्याची शपथ घ्यायला हवी.
किती नाविन्यपूर्ण आहे ना हे? या मोहिमेच्या अपारंपरिक अशा व्यवस्थेमुळे हात न धुतल्याने आजाराचा मुख्य स्रोत होऊ शकतात हे जाणून घेऊन हात धुणे तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मदत करू शकतात आणि तुमच्या निरोगीपणाचा मार्ग मोकळा करू शकतात याची नक्कीच मदत होणार आहे.
अतिसार, कॉलरा, टायफॉईड, श्वसन संक्रमण इत्यादी आजारांविरूद्ध हाताची अयोग्य स्वच्छता हे मुख्य कारण आहे. या रोगांपासून बचावासाठी स्वच्छ हात धुणे हे पहिले पाऊल आहे. WHO नुसार, साबणाने हात स्वच्छ धुतल्याने न्यूमोनिया आणि अतिसार या दोन रोगांपासून पाच वर्षांखालील मुलाचा बचाव होऊ शकतो. तर युनिसेफच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, साबणाने हात धुतल्याने अतिसाराची ४७% आणि श्वसन संक्रमणाची २३% प्रकरणे ही कमी झाली आहेत.
आरोग्याचे धोके कमी करण्यासाठी, आरोग्यासंबंधित संक्रमण घालविण्यासाठी, संसर्गजन्य आजारांचे संक्रमण, प्रतिजैविक आजारांचा प्रसार आणि अन्य धोकादायक आजार थांबविण्यासाठी ही अत्यंत सोपी कृती आणि प्राथमिक पद्धत आहे. त्याअर्थी ITC’s Savlon Swasth India Mission हे हाताच्या स्वच्छतेच्या सवयीमध्ये बदल घडवून आणण्यात अग्रेसर आहे.
WHO ने विषाणूंचा नाश करण्यासाठी केवळ २० सेकंदासाठी साबणाचा आणि पाण्याचा वापर करून हात स्चव्छ धुण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा तुम्ही हाताच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष कराल तेव्हा लक्षात ठेवा की, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हात धुणे गरजेचे असून यासाठी काही सेकंदच लागतात.