MUMBAI/NHI :
ब्लू स्टार लिमिटेडने यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामासाठी ‘बेस्ट-इन-क्लास अफोर्डेबल’ श्रेणी तसेच ‘फ्लॅगशिप प्रीमियम’ श्रेणीसह एसीच्या नवीन व्यापक अशा श्रेणीचे आज ग्राहकांसाठी अनावरण केले. कंपनीने इनव्हर्टर, फिस्क्ड स्पीड आणि विंडो एसी अशा विविध प्रकारात तसेच प्रत्येक ग्राहक वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध किंमत पातळीवर जवळपास 75 मॉडेल्स बाजारात आणले आहेत.
कंपनीने 2020 मध्ये बाजारात स्वतःचे एक मास प्रीमियम ब्रँड म्हणून व्यूहात्मकदृष्ट्या पुनर्स्थान निर्माण केल्यानंतर किंमतीच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असलेल्या आणि टियर २, ३, ४ आणि ५ या शहरातील बाजारपेठेत एसीचे प्रथमच खरेदीदार असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच परवडण्याजोगी स्वस्त स्प्लिट एसीची नवीन, आगळीवेगळी आणि सर्वोत्कृष्ट श्रेणी आणली आहे. अर्थात त्यासाठी कंपनी आपल्या उत्पादन, संशोधन आणि विकास तसेच नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या क्षमतेत सातत्याने वाढ करण्यावर भर देत आहे.
ब्लू स्टारने एकूण खर्च व्यवस्थापन (टीसीएम) कार्यक्रमाचादेखील अवलंब केला आहे, त्याआधारे संपूर्ण खर्च-मूल्य साखळीच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यावर भर दिला जात आहे.
ब्रॅण्ड एम्बेसेडर विराट कोहली
रुम एसीसाठी क्रिकेटपटू विराट कोहली हा ब्लू स्टारचा ब्रॅण्ड एम्बेसेडर राहिलेला आहे. आपल्या सर्वोत्तम उत्पादनांमुळे प्रदीर्घ कालावधीत विराट कोहलीप्रमाणे ब्लू स्टारसुध्दा विविध उत्पादन प्रकारात सतत चमकदार कामगिरी बजावत आहे.
श्री सिटी येथे ब्लू स्टार क्लायमेटेकचा नवीन स्वयंचलित आणि स्मार्ट उत्पादन प्रकल्प
आत्मनिर्भर भारत अभियानाचा ब्लू स्टार हा एक मजबूत समर्थक असून, त्याच्या पूर्ण मालकीच्या ब्लू स्टार क्लायमेटेक लिमिटेड या उपकंपनीद्वारे श्री सिटी येथे अत्याधुनिक उत्पादन सुविधा उभारली आहे. ब्लू स्टार क्लायमेटेकने जानेवारी 2023 मध्ये या उत्पादन प्रकल्पातून रूम एसीचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. ब्लू स्टार येथून काही नवीन उत्पादने तयार करणार आहे. हा नवीन स्वयंचलित आणि स्मार्ट कारखाना त्याच्या असेंब्ली लाइन आणि उत्पादनाच्या हाताळणीसाठी नवीनतम ऑटोमेशन तंत्र आणि साधनांसह सुसज्ज आहे, तसेच कृत्रिम बुध्दीमत्ता (आयओटी) आणि डिजिटायझेशनच्या दिशेने कंपनीने अनेक उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरु केले आहेत. कंपनीने आतापर्यंत या प्रकल्पासाठी अंदाजे 350 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे (नियोजित एकूण 550 कोटी रुपयांपैकी या प्रकल्पासाठी काही वर्षांत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक). या प्रकल्पात एक जानेवारी 2023 रोजी उत्पादन सुरू झाले असून पहिल्या वर्षात सुमारे 3 लाख युनिट्स उत्पादन केले जाईल आणि त्यानंतर हळूहळू उत्पादन बारा लाख युनिट्सपर्यंत वाढवले जाणार आहे.
‘सर्वोत्तम श्रेणीतील स्वस्त’ अर्थात ‘बेस्ट-इन-क्लास अफोर्डेबल’ एसींची नवीन श्रेणी
कंपनीच्या नवीन श्रेणीमध्ये 3-स्टार, 4-स्टार आणि 5-स्टार इनव्हर्टर स्प्लिट एअर कंडिशनर्सचा समावेश असून त्यांची विविध कुलिंग क्षमता 0.8 TR ते 2 TR दरम्यान असून ते 29,990 रुपयांपासून सुरू होणाऱ्या आकर्षक किमतींमध्ये उपलब्ध आहेत.
1.5 TR 3-स्टार इनव्हर्टरसेगमेंट हा श्रेणीतील सर्वाधिक विस्तृत आहे. त्यात ब्लू स्टारने या विभागातही अनेक सुटसुटित आणि आणि नव्याने विकत घेत असलेल्या ग्राहकांसाठी परवडण्याजोगे एंट्री-लेव्हल मॉडेल आणले आहेत.
नवीन श्रेणीत अनेक ग्राहकाभिमुख सुविधा आणि वैशिष्ट्ये आहेत. त्यात प्रामुख्याने वेगवान थंडावा मिळण्यासाठी ‘टर्बो कुल’, वरच्या किंवा खालच्या दिशेने कुलिंगची क्षमता बदलण्यासाठी कन्वर्हटेबल 5-इन-1 कुलिंग, कॉईलचे गंजणे आणि गळती रोखण्यासाठी आयडीयू आणि ओडीयूसाठी नॅनोब्लू प्रोटेक्ट टेक्नॉलॉजी आणि हायड्रोफिलीक ब्लू फिन कोटींग तसेच उपकरण प्रदीर्घ काळ टिकण्यासाठी वीजबचतीचा इको-मोड, एसी वापरणाऱ्या ल्यक्तीला रात्रीच्यावेळी आरामदायी वाटण्यासाठी स्वयंचलित पध्दतीने एसीचे तापमान नियंत्रित करणारे तसेच वीज वाचविणारी कमफर्ट स्लीप सुविधा, हवेचा झोत एकसमान राहण्यासाठी 4-वे स्विंग आणि बिघाडाचे निदान होण्यासाठी सेल्फ डायग्नोसिस यासारख्या सुविधा नवीन श्रेणीत आहेत. त्याचबरोबर पीसीबीला अतिरिक्त सुरक्षा मिळण्यासाठी या नवीन एसींमध्ये धातूचे कवच समाविष्ट करण्यात आलेले आहे.
संपुर्ण इनव्हर्टर रेंजसाठी R-32 हे इको-फ्रेंडली रेफ्रीजरेंट वापरण्यात आलेले आहे.
ब्लू स्टारचे सर्व इनव्हर्टर एसी हे स्मार्ट रेडी आहेत आणि वेगळ्या स्मार्ट मॉड्युलचा समावेश करुन ते स्मार्ट एसीमध्ये रुपांतरित करता येऊ शकतात.
ब्लू स्टारच्या इन्व्हर्टर एसीचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे त्यांचा व्होल्टेजचा पल्ला खुपच विस्तृत असल्याने बाह्य व्होल्टेज स्टॅबेलायझरची आवश्यकता भासत नाही. यामुळे स्टॅबेलायझरच्या खर्चात बचत तर होतेच, परतु त्याचबरोबर एसीच्या बाजूला ते बसविण्यासाठी अतिरिक्त जागेची गरजही भासत नाही.
सुधारित वैशिष्टांसह फ्लॅगशीप मॉडेल्स
सुपर एनर्जी इफिशिएंट एसीज, हेवी ड्यूटी एसीज, एसीज विथ हॉट अॅण्ड कोल्ड टेक्नॉलॉजी आणि एसी विथ अण्टी-मायक्रोबिएल फिल्टर आदी सुविधांसह कंपनीने फ्लॅगशीप मॉडेल्सची व्यापक आणि विस्तृत श्रेणी बाजारात आणली आहे. त्याद्वारे कंपनी ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारच्या गरजांकरिता व्यापक असे पर्याय या नवीन एसींच्या माध्यमातून देत आहे.
खोलीत हवेच्या उच्चतम झोताच्या माध्यमातून अधिकाधिक थंडावा देण्याबरोबरच महत्तम उर्जा कार्यक्षमता साध्य करण्यासाठी आगळीवेगळी डायनॅमिक ड्राईव्ह टेक्नॉलॉजी वीज बचतीबाबत ‘अत्युत्तम कार्यक्षम असलेल्या ब्लू स्टारच्या या एसीच्या’ श्रेणीत आहे. परिणामी 1.5 TR क्षमतेचा इन्वर्हटर स्प्लीट एसीने 5.41 ISEER ही क्षमता हासील केली असून ती कोणत्याही 3-स्टार इनव्हर्टर एसीपेक्षा 40% अधिक आहे.
उन्हाळा शिगेला असताना भारतात दरवर्षी तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सर्वोत्तम वैशिष्टांसह तयार करण्यात आलेले कंपनीचे उच्च श्रेणीतील ‘हेवी ड्युटी एसी’ हे खूपच शक्तिशाली आहे आणि ते 56º सेल्सियस तापमानालासुध्दा अतिशय वेगाने थंडावा आणि आल्हाददायकपणा रुममध्ये प्रदान करतात. या एसींमध्ये 50 फुटांपर्यत आणि चारही दिशांना ताकदीने हवेचा झोत सोडण्याची क्षमता आहे.
कंपनीने ‘स्मार्ट इनव्हर्टर स्प्लीट एसी’ हे अतिशय वैशिष्टपुर्ण उत्पादन बाजारात आणले आहे. त्यात प्रामुख्याने अतिशय आगळीवेगळी आणि स्मार्ट वैशिष्टे आहेत. स्वतःसाठी तापमान आधीच निश्चित करणारी कस्टमाईज्ड स्लीप सुविधा, बारा तासांच्या कालावधीत दर तासाला फॅन स्पीड आणि एसी चालू-बंद करण्याच्या सुविधांचा समावेश आहे. याचबरोबर शेड्युलर, 15 एसींसाठी मल्टी ग्रुपिंग, अॅपच्या माध्यमातून दुरस्थ ठिकाणाहून सेवेचे पाठबळ आदींचीसुध्दा जोड त्यांना देण्यात आलेली आहे. आवाजाच्या माध्यमातून आज्ञा देण्य़ाच्या नव्या व्हाईस कमांड तंत्रज्ञानामुळे अॅमेझॉन एलेक्सा अथवा गुगल होम या स्मार्ट उपकरणांच्या सहाय्याने ग्राहक इंग्रजी अथवा हिंदी भाषेतून त्यांचे एसी संचलित करु शकतात.
ग्राहकांना अतिशय परवडण्याजोग्या किंमतीत अद्वितीय कुलिंग प्रदान करणारे ब्लू स्टारचे एअर कंडिशनर्स हे त्याच्या दर्जा, विश्वासार्हता आणि टिकाऊपणा यासाठी प्रसिध्द असल्याने ब्लू स्टारला या उद्योगक्षेत्रात एक ख्यातनाम कंपनी म्हणून ओळख मिळालेली आहे.
कंपनीने 2011 मध्ये घरगुती एसी क्षेत्रात आपले पाय रोवल्यानंतर या प्रकारातसुध्दा ब्लू स्टार अतिशय ताकदीने वाढली आहे. कंपनीने उद्योगक्षेत्रापेक्षा कितीतरी पटीने चमकदार कामगिरी बजावलेली आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत रुम एअर कंडिशनर प्रकारात 15% बाजार हिस्सा काबीज करण्याचे उद्दीष्ट कंपनीने आखलेले आहे.
आपल्या उत्पादनांसाठी कंपनी वॉरंटी आणि सहजसोपे वित्तसहाय्यसुध्दा प्रदान करते.