NHI
मुंबई, : फ्युचर जेनेराली लाइफ इन्श्युरन्स कंपनीने अधिक वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ होण्याच्या दृष्टिकोनाशी प्रामाणिक राहत, कंपनीने शी लीड्स हा उपक्रम सुरू केला आहे. कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांचे सबलीकरण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. परस्परांची प्रगती करण्याची संस्कृती निर्माण करणे, जेणेकरून क्रॉस फंक्शनल ट्रेनिंग (कर्मचाऱ्यांच्या मूळ क्षमतेव्यतिरिक्त इतर बाबतीत प्रशिक्षण देणे) आणि आउटसाईड-इन दृष्टिकोन (केवळ उत्पादन व विक्री यावर भर न देता ग्राहकांना उपयुक्त किंवा मूल्य प्रदान करणारी सेवा देणे) निर्माण करता येईल, हा या उपक्रमाचा हेतू आहे.
शी लीड्स उपक्रमाचा फ्युचर जेनेराली इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनीमधील १५० महिलांना लाभ झाला असून या उपक्रमाचा दुसरा सीझन पूर्ण झाला आहे. या ६ आठवड्यांच्या कार्यक्रमात सर्व सहभागींनी स्वतःला किमान एक चांगली सवय लावून घेतली, ज्या कारणाने त्यांना कॉर्पोरेट व वैयक्तिक आयुष्यात आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाताना विचारी, संतुलित आणि जागरुक केले. आता असहाय्य वाटण्याऐवजी आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला, अशी भावना सहभागींनी व्यक्त केली.
फ्युचर जेनेराली इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनी लि.च्या सीएचआरओ रीना त्यागी म्हणाल्या, “महिला सहकाऱ्यांचा एक गट आम्हाला तयार करायचा आहे आणि ज्या लीडर्सनी हे अडथळे पूर्वी पार केले आहेत त्यांच्याशी या गटाने संवाद साधावा आणि त्यांच्याकडून शिकावे हा आमचा हेतू आहे. महिलांची प्रगती व विकास याच्याशी संबंधित विषयांबाबत आवश्यक शिकवण व व्यवहार्य दृष्टिकोन देऊन त्यांना सक्षम करणे हा आमचा हेतू आहे. फ्युचर जेनेराली इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनी खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ होण्यासाठी व विकसित होण्यासाठी आमचा प्रत्येक कार्यक्रम व धोरणे आखलेली आहेत. आणि शी लीड्ससारख्या पुढाकारांच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांना सांस्कृतिक व शाश्वत पाठबळ मिळेल.”