एचएमडी ग्लोबलने (HMD Global)आपला नवीन 5G स्मार्टफोन Nokia X30 भारतात लॉंन्च केला. सप्टेंबरमध्ये हा हँडसेट जागतिक स्तरावर सादर करण्यात आला होता. कंपनीचे म्हणणे आहे की, फोनची फ्रेम 100% रिसायकल केलेल्या aluminiumची बनलेली आहे. मागील कव्हर 65% रियालकलींग केलेल्या प्लास्टिकने बनलेली आहे.
Nokia X30 : किंमत आणि फीचर्स
Nokia X30 च्या 8 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 48,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन क्लाउडी ब्लू आणि आइस व्हाइट कलर पर्यायांसह येतो. कंपनीच्या अधिकृत साइट आणि Amazon वर हँडसेटची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. Nokia X30 5G ची विक्री 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
नोकिया X30 सविस्तर जाणून घ्या
- डिस्प्ले : स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो फुल-एचडी+ रिझोल्यूशन ऑफर करतो. संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचा वापर करण्यात आला आहे. फोनची कमाल ब्राइटनेस 700 nits आहे.
- चिपसेट : वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, Nokia X30 5G मध्ये उच्च कार्यक्षमतेसाठी Adreno 619L GPU सह स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
- सॉफ्टवेअर : स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टम आणि स्टॉक Android UI सह लॉन्च करण्यात आला आहे. फोनला 3 वर्षांसाठी 3 OS अपग्रेड आणि मासिक सुरक्षा अपडेट मिळत राहतील.
- कॅमेरा : फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- बॅटरी : फोनमध्ये 4200 mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते.
- कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये 5G, Wi-Fi, GPS, NFC, ब्लूटूथ 5.1 आणि USB टाइप-सी पोर्टसह सुरक्षिततेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.