आपत्कालीन सामग्रीमध्ये जीवनरक्षक औषधे, संरक्षणात्मक वस्तू आणि महत्वाची काळजीवाहू उपकरणे यांचा मदतीमध्ये समावेश. त्याचे मूल्य 7 कोटी रुपये असून ते तातडीने तुर्की आणि सीरियाला पाठवले
भारत, वसुधैव कुटुंबकम या प्राचीन परंपरेच्या भावनेने दोन्ही देशांना मदत करत आहे: डॉ मनसुख मांडविया
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भूकंपग्रस्त सीरिया आणि तुर्किला मानवतावादी वैद्यकीय मदत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविया यांनी आज एका ट्विट संदेशात एरो आणि सीरियाला पुरविण्यात आलेल्या आपत्कालीन मदत सामग्रीची माहिती दिली. “वसुधैव कुटुंबकम् या प्राचीन परंपरेनुसार भारत दोन्ही देशांना मदत करत आहे” असे ते म्हणाले.
सीरिया आणि तुर्किएमधे 6 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या दोन विनाशकारी भूकंपानंतर 12 तासांच्या आत हिंडन विमानतळांवर 3 ट्रक भरून मदत सामग्रीची व्यवस्था करण्यात आली होती. जीवनरक्षक आपत्कालीन औषधे आणि सुरक्षात्मक वस्तूंचा यात समावेश होता. 7 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यंत ट्रक पोहोचायला सुरुवात झाली आणि 04:00 वाजेपर्यंत भारतीय हवाई दलाला (आयएएफ) मदत सामग्री सुपूर्द करण्यास सुरुवात झाली. शेवटचा ट्रक रात्री 09:30 पर्यंत पोहोचला आणि त्याच दिवशी रात्री 10:00 वाजता मदत कार्यासाठी आपत्कालीन मदत सामग्रीसह विमान सीरियाला रवाना झाले. या खेपेत 5,945 टन आपत्कालीन मदत साहित्याचा समावेश होता. त्यात 27 जीवरक्षक औषधे, दोन प्रकारच्या सुरक्षात्मक वस्तू आणि तीन श्रेणीतील महत्वाची काळजीवाहू उपकरणे होती. त्यांची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे.
तुर्की आणि सीरिया या दोन्ही देशांसाठी 10 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्रीची व्यवस्था करण्यात आली होती. सीरियासाठी महत्वाची 72 औषधे, उपयुक्त वस्तू आणि 7.3 टन सुरक्षात्मक वस्तूंचा समावेश आहे. त्यांची किंमत 1.4 कोटी रुपये आहे. तुर्किएसाठी पाठवलेल्या मदत सामग्रीमध्ये 14 प्रकारच्या वैद्यकीय आणि काळजीवाहू उपकरणांचा समावेश आहे. त्याची किंमत 4 कोटी रुपये आहे.
तुर्कीला पाठवलेल्या वैद्यकीय मदत साहित्याची यादी खालीलप्रमाणे आहे:
सीरियाला पाठवलेल्या वैद्यकीय मदत
साहित्याची यादी खालीलप्रमाणे आहे: