-
गॅलॅक्सी फ्यूजन्स डार्क चॉकलेटसह प्रतिष्ठित जागतिक चॉकलेट ब्रॅण्ड्सच्या स्थानिक उत्पादनामध्ये वाढ
-
यासह ब्रॅण्डला भारतातील मोल्डेड विभागातील अव्वल तीन चॉकलेट ब्रॅण्ड्समधील आपले स्थान दृढ करण्याकरिता श्रेणीच्या पुढे दुहेरी अंकांनी वाढ करण्याची अपेक्षा
फेब्रुवारी २०२३: मार्स रिग्ली इंडिया या चॉकलेट्स, च्युईंग गम्स, मिंट्स व फ्रूटी कंफेक्शन्सच्या जागतिक आघाडीच्या उत्पादकाचा भारतीय व्यवसाय आणि १०० वर्षे जुनी यूएस-स्थित मार्स इन्कॉर्पोरेटडचा ट्रिट्स व स्नूक्स विभागाला भारतात ७० टक्के कोकोआने युक्त गॅलॅक्सी® फ्यूजन्स डार्क चॉकलेटचे लाँच व स्थानिक उत्पादनाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. यासह मार्स रिग्ली इंडियाने भारतातील डार्क चॉकलेट श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे आणि ६० वर्षे जुना जागतिक स्तरावर लोकप्रिय ब्रॅण्ड गलॅक्सी®च्या स्थानिक उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. कंपनीला विश्वास आहे की, ऑफर करण्यात आलेल्या डार्क चॉकलेट उत्पादनाचे अनेक ग्राहक स्वागत करतील, ज्यांची शुद्ध स्वादापासून डार्क चॉकलेटसह ‘बेटर फॉर यू’ ट्रिट्सपर्यंत स्नॅक्समध्ये विविध पर्याय मिळण्याची इच्छा आहे.
स्वादिष्ट व्हेरिएण्ट्सच्या गॅलॅक्सी® ब्रॅण्ड पोर्टफोलिओमध्ये डार्क चॉकलेटची भर करत मार्स रिग्ली इंडिया मोल्डेड चॉकलेट्स श्रेणीमधील आपली उपस्थिती दृढ करण्याचा प्रयत्न करते. कंपनीने ऑक्टोबर २०२१ मध्ये पुण्यातील त्यांच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन केंद्रामध्ये त्यांच्या पोर्टफोलिओमधील प्रतिष्ठित ब्रॅण्ड गॅलॅक्सी®च्या स्थानिक उत्पादनाची घोषणा केली. हा कंपनीसाठी लक्षणीय टप्पा होता, जेथे गॅलॅक्सी® २०१६ मध्ये स्निकर्स® नंतर भारतीय बाजारपेठेसाठी भारतात स्थानिकरित्या उत्पादित केला जाणारा दुसरा जागतिक चॉकलेट ब्रॅण्ड बनला.
या लाँचची घोषणा करत मार्स रिग्ली इंडियाचे कंट्री जनरल मॅनेजर कल्पेश परमार म्हणाले, ‘‘आम्हाला भारतात ७० टक्के कोकोआने युक्त गॅलॅक्सी® फ्यूजन्स डार्क चॉकलेट लाँच करण्याचा अत्यंत आनंद होत आहे. आम्ही पुण्यातील आमच्या जागतिक दर्जाच्या चॉकलेट उत्पादन केंद्रामध्ये भारतातील जागतिक ब्रॅण्डचे उत्पादन करत आहोत, जे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आमच्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे, जेथे आम्ही भारतात तीच क्वॉलिटी व सिग्नचेर पाककृतींसह जागतिक स्तरावरील लोकप्रिय ब्रॅण्ड निर्माण करण्याकरिता आमच्या स्थानिक उत्पादन क्षमतांमध्ये वाढ करत आहोत. यामधून निश्चितच आम्हाला उत्तम उत्पादन व फ्रेश उपलब्धता देण्याची आणि अधिकाधिक भारतीय ग्राहकांना या चॉकलेटचा आस्वाद देण्याची संधी मिळते. गॅलॅक्सी® फ्यूजन्समध्ये गॅलॅक्सी® ज्यासाठी ओळखले जाते ते डार्क चॉकलेट व सिग्नचेर स्मूद टेस्टच्या आधुनिक अनुभवाचे अद्वितीय संयोजन आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, ऑफर करण्यात आलेल्या डार्क चॉकलेट उत्पादनाचे अनेक ग्राहक स्वागत करतील, ज्यांची शुद्ध स्वादापासून डार्क चॉकलेटसह ‘बेटर फॉर यू’ ट्रिट्सपर्यंत स्नॅक्समध्ये विविध पर्याय मिळण्याची इच्छा आहे.
भारत मार्स रिग्लीसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आम्ही श्रेणीची वाढ करण्याप्रती कटिबद्ध आहोत. गेल्या काही वर्षांपासून आम्ही आमचे जागतिक स्तरावरील लोकप्रिय ब्रॅण्ड्स लाँच करत आलो आहोत आणि भारतासाठी सुसज्ज पोर्टफालिओ विकसित करण्यासाठी नाविन्यता आणत आहोत. आमचा भारतीय कुटुंबांमध्ये उच्च दर्जाचे चॉकलेट्स व कंफेक्शनरी आणण्याचा प्रयत्न आहे.’’
मार्स रिग्ली इंडियाचे विपणन संचालक वरूण कंधारी म्हणाले, ‘‘आमचा विश्वास आहे की, गॅलॅक्सी® फ्यूजन्स डार्क चॉकलेट भारतीय ग्राहकांना आनंदित करेल. गॅलॅक्सी® फ्यूजन्स प्रिमिअम सिग्नेचर रेसिपी, ७० टक्के कोकोआ कन्टेन्ट आणि संपन्न, स्मूद टेक्स्चरसह डार्क चॉकलेट अनुभवामध्ये वाढ करेल. हे स्मूद डार्क व्हेरिएण्ट निश्चितच चॉकलेटप्रेमींना व मर्मज्ञांना उच्च दर्जाचा बहु-संवेदी अनुभव देईल.’’
गॅलॅक्सी® फ्यूजन्स डार्क चॉकलेट देशभरातील पारंपारिक, आधुनिक रिटल आऊटलेट्समध्ये आणि सर्व ई-कॉमर्स पोर्टल्सवर ९० रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध असेल. मार्स रिग्लीच्या जागतिक स्तरावर लोकप्रिय ब्रॅण्ड्सच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये स्निकर्स®, बाऊंटी®, एमअॅण्डएम®, स्किटल्स®, ऑर्बिट®, डाबलमिंट®, बूमर®, सोलॅनो® अशा अनेक व्हेरिएण्ट्सचा समावेश आहे.