बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी १० फेब्रुवारी रोजी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत अध्यक्षपदी मारुती मोरे (दै. आपलं महानगर), तर उपाध्यक्ष पदी सचिन धानजी (हिंदुस्थान पोस्ट), सरचिटणीसपदी राजेश सावंत (दै. पुढारी) यांची निवड करण्यात आली. नवीन पदाधिका-यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह व बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष विष्णू सोनावणे यांनी अभिनंदन केले.
नविन कार्यकारिणी
- अध्यक्ष – मारुती मोरे (दै. आपलं महानगर)
- उपाध्यक्ष – सचिन धानजी (हिंदुस्थान पोस्ट), दिनेश सिंह (दै. हमारा महानगर)
- सरचिटणीस – राजेश सावंत (दै. पुढारी)
- सह चिटणीस – अजय जाधव (ई टी व्ही), हेमंत साटम (महाराष्ट्र टाइम्स)
- खजिनदार – श्रीरंग सुर्वे (दै. प्रात:काल)
- सह खजिनदार – गिरीश चित्रे (दै. नवशक्ती)
- हिशोब तपासनीस – प्रसाद रावकर (दै.लोकसत्ता), रईस अन्सारी (मुंबई उर्दू न्यूज)
कार्यकारिणी सदस्य
संजय जाधव (दै. पुण्यनगरी), देवेंद्र भगत (दै. सामना), कृष्णात पाटील (झी २४ तास), विनायक डावरुंग (टीव्ही-९), कल्पेश म्हामुणकर (दै. फ्री प्रेस), ओ.पी. तिवारी (दै. नवभारत), इंद्रायणी नार्वेकर (दै. लोकसत्ता), सीमा दाते (लोकशाही)
सल्लागार
विष्णू सोनावणे (आकाशवाणी), नितीन चव्हाण (दै. महाराष्ट्र टाइम्स)