December 25, 2022: देशातील सर्वात प्रतिष्ठित मीडिया नेटवर्क ‘एबीपी नेटवर्क’ने (ABP Network) ‘एबीपी लाईव्ह ऑटो 2022 अवॉर्ड्स’चे (ABP Live Auto Awards 2022) आयोजन केले होते. या अंतर्गत विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट कार आणि बाईक्सची निवड करण्यात आली. कार आणि बाईक निवडताना ऑटोमोटिव्ह आयडियाज आणि त्यांची वैशिष्ट्ये यांची काळजी घेण्यात आली आहे. या कार आणि बाईक्सवरून ग्राहकांना त्यांच्यासाठी कोणती कार योग्य आहे, याची कल्पनाही येईल. या पुरस्कारामध्ये एंट्री लेव्हल कार ऑफ द इयर, हॅचबॅक ऑफ द इयर, सेडान ऑफ द इयर, फन कार, प्रीमियम एसयूव्ही ऑफ द इयर अशा अनेक श्रेणींमध्ये कार आणि बाईक्सची निवड करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम ICAT कन्व्हेन्शन सेंटर, मानेसर येथे पार पडला. तसेच हा कार्यक्रम काल (20 डिसेंबर 2022, मंगळवार) abplive.com आणि ABP LIVE + ऑटो लाईव्ह सोशल मीडिया हँडल आणि YouTube प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.
Audi आणि PS Group यांच्या प्रायोजकत्वात केलेल्या ABP Live Auto Awards ने संपूर्ण ऑटोमोटिव्ह उद्योगाला एकत्र आणले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव केला आहे. बाईक्स आणि लक्झरी कार अशा 15 श्रेणींमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात कार्यक्षमता, कार्यप्रदर्शन, मूल्य, डिझाईन आणि व्यावहारिकता यांसारख्या विविध आवश्यक बाबींच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात उद्योगातील अपवादात्मक नवकल्पनांचा गौरव करण्यात आला.
एबीपी लाईव्ह ऑटो अवॉर्ड्समध्ये कार ऑफ द इयर पुरस्कार Hyundai Tucson मिळाला, तर Maruti Grand Vitara ‘एसयूव्ही ऑफ द इयर 2022’ विजेतेपदासाठी पात्र ठरली. VW Virtus ने ‘सेडान ऑफ द इयर 2022’ पुरस्कार जिंकला, Citroen C3 ला ‘हॅचबॅक ऑफ द इयर 2022’ हा पुरस्कार देण्यात आला आणि आलिशान लँड रोव्हर रेंज रोव्हरला ‘वर्ष 2022 ची लक्झरी कार’ म्हणून पुरस्कार देण्यात आला.
Vijay Jung Thapa, Chief Digital Officer at ABP Network, ”एबीपी नेटवर्कने सुरू केलेल्या या पुरस्काराला मिळालेल्या पाठिंब्यामुळे, त्याच्या यशामुळे आम्ही आनंदी आहोत. आमचे दर्शक आणि उद्योग व्यावसायिकांच्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि सहभागींना त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. भारतात ऑटोमोटिव्ह उद्योगाला पुढे नेण्यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत. यामध्ये नवनवीन कल्पना, उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्य आणि इतर गोष्टींवर प्रकाश टाकायला हवं. सर्व ऑटो प्रेमींसाठी एबीपी नेटवर्क एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म, ऑटो लाईव्ह घेऊन आले आहे. यामध्ये ऑटोमोबाईल्सशी संबंधित सर्व बातम्या, रिव्ह्यू आणि त्याचे अपडेट्स याची सविस्तर माहिती असेल. त्याला ऑटो लाईव्ह चॅनेलचा अॅक्सेस असेल.”
कोणत्या कार आणि बाईकला मिळाला पुरस्कार?
● Citroen C3: Hatchback of the Year
● VW Virtus: Sedan of the Year
● Maruti Grand Vitara: SUV of the Year
● Hyundai Tucson: Premium SUV of the Year
● Jeep Grand Cherokee: Luxury SUV of the Year
● Jeep Meridian: Off-Roader of the Year
● Land Rover Range Rover: Luxury Car of the Year
● Mercedes EQS 580 4MATIC: EV of the Year
● Ferrari 296 GTB: Performance Car of the Year
● Hyundai Tucson: Car of the Year
● Maruti Alto K10: Entry-Level Car of the Year
● Maruti Brezza: Compact SUV of the year
● Hyundai Venue N-Line: Fun-to-Drive Car of the Year
● Bajaj Pulsar N160: Bike of the Year
● Suzuki Katana: Premium Bike of the Year
एबीपी नेटवर्कने ऑटो इंडस्ट्रीबद्दल प्रत्येक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑटो लाइव्ह हे नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. यामध्ये ऑटोमोबाईल्सशी संबंधित सर्व बातम्या, रिव्ह्यू आणि अपडेट्स मिळतील. ऑटो लाईव्ह चॅनल इन्स्टाग्राम, युट्यूब आणि abplive.com वर आढळू शकते.
एबीपी नेटवर्क बद्दल-
एबीपी नेटवर्क्स ही एक नावीन्यपूर्ण माध्यम आणि सामग्री निर्मिती कंपनी आहे. तसेच प्रसारण आणि डिजिटल स्पेसमधील एक विश्वासार्ह आवाज आहे. भारतात आज विविध भाषांमधील अनेक वृत्तवाहिन्यांसह 535 दशलक्ष लोकांपर्यंत आपली पोहोच आहे. एबीपी स्टुडिओ, जे एबीपी क्रिएशन्स अंतर्गत येतात, हे नेटवर्कच्या कंटेंट इनोव्हेशनचे जीवन आहे. आपली ओळख बातम्यांमध्ये असते तशीच त्याच्या बाहेरच्या जगातही असते. एबीपी नेटवर्क्स, एबीपी ग्रुपचे एक युनिट, जवळजवळ 100 वर्षांपूर्वी समाविष्ट केले गेले आणि आज ती एक आघाडीची मीडिया कंपनी म्हणून मीडिया उद्योगावर राज्य करत आहे.