भारत, 21 डिसेंबर 2022 :तोंडाला पाणी आणणाऱ्या चटणीशिवाय तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची कल्पना करून पाहा. प्रत्येक भारतीय जेवण आणि अल्पोपहारात चटणी हा एक अनिवार्य घटक असतो. चटणी ही आपली प्राचीन संस्कृती आहे आणि तुमच्या जीभेची भूक भागविणारी असते. कोणत्याही सौम्य पदार्थाला आपल्या चटकदार स्वादाने हीच चटणी रुचकर बनवते.
सामोसा, बटाटे वडा, भजी, पनीर टिक्का असो वा हराभरा कबाब, हे सर्व पदार्थ कोथिंबीर-पुदिन्याच्या चटणीशिवाय अपूर्णच आहेत. रगडा पॅटिस, दही भल्ला, शेव पुरी, पापडी चाट हे पदार्थ असतील, तर चिंचेची चटणी हवीच! मदर्स रेसिपी हा भारतातील आघाडीचा फुड ब्रँड चटणीच्या कॅटेगरीमध्ये अग्रेसर आहे. त्यांनी आता रु. 25-30 च्या किमतीत ‘छोटू चटणी’ ही नवी श्रेणी सादर केली आहे. चटणीची ही नवी श्रेणी वाजवी किमतीत उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे तिचा स्वाद अस्सल आहे आणि ती प्रवासात सहज बाळगता येऊ शकते. तुमचा आवडता पदार्थ चटणीला लावून खाता येऊ शकतो. चिंच-खजूर, कोथिंबीर-पुदिना, पाणीपुरी पेस्ट मिक्स, भेळपुरी चटणी ही ‘छोटू चटणी’ची श्रेणी मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली एनसीआर, बंगळुरू, अहमदाबाद, ठाणे, बडोदा, सुरत येथे उपलब्ध आहे आणि इतर शहरांमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे. लाल मिरचीचा ठेचा मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
रुचकर भारतीय चटण्या
हायजिनिक व विश्वासार्ह
प्रवासात सहज बाळगता येतात
सुलभ व सोयिस्कर पॅकेजिंग – अरोमा सील्ड आणि स्पिल-प्रूफ
छोटू चटणी स्पाउट पॅकचा लुक आधुनिक, ट्रेंडी व प्रीमिअम आहे
साठविण्यास सोप्या
भारतीय पदार्थ आणि चटपटीत चटणी हा एक जीभेची भूक भागविणारा संयोग आहे. मदर्स रेसिपी चटणी श्रेणीत मसाल्यांचे परफेक्ट मिश्रण आहे. हे सर्वच्या सर्व 5 प्रकार छोटू स्पाउट पाकिटांमध्ये उपलब्ध आहेत. ते बाळगण्यास सोपे, वापरण्यास सुलभ आणि वाजवी किमतीत उपलब्ध आहे. त्यांचा लुकही आधुनिक व प्रीमियम आहे. या पाकिटांवर अरोमा-सिल्ड बुच आहे आणि स्पिल-प्रूफ (यातून चटणी सांडत नाही) आहेत. आकर्षक पॅकेजिंग व ओतण्यास सोपे असलेल्या स्पाउट पाकिटांमुळे रोजच्या घरगुती लज्जत अजून वाढेल, याची खात्री आहे.
छोटू चटणी श्रेणीवर प्रतिक्रिया देताना कार्यकारी संचालक संजना देसाई म्हणाल्या, “चवीचे समाधान देणाऱ्या आणि भारतीय ग्राहकांना रुचणारी उत्पादने उपलब्ध करून देण्याचा मदर्स रेसिपीमध्ये आमचा निर्धार आहे. सर्वच्या सर्व 5 प्रकार लहान आकाराच्या पाकिटामध्ये उपलब्ध करून दिल्याने प्रत्येकासाठी या चटण्या बाळगणे व वापरणे सुलभ होईल आणि त्याच वेळी या चटण्या विविध पदार्थांसोबत खाता येतील. आम्ही जाणीवपूर्व या रुचकर चटण्या सुलभ व सहज ओतता येणाऱ्या स्पाउट पाकिटात उपलब्ध करून दिल्या आहे, जेणेकरून घरी उत्तम व दर्जेदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची सवय बाणवली जाईल.”