आघाडीची संशोधन कंपनी YouGov सोबत सहयोगाने १० शहरांमधील ४६०० हून अधिक सहभागींसह सर्वेक्षण करण्यात आले
मुंबई, डिसेंबर १२, २०२२: डीएसपी विन्वेस्टर पल्स २०२२ स्टडीमधून निदर्शनास आले की, जवळपास ३ पैकी २ पुरूष (६५ टक्के) मोठ्या प्रमाणात स्वत:हून गुंतवणूक निर्णय घेतात, तर फक्त काहीच (४४ टक्के) महिला तसे करतात. डीएसपी म्युच्युअल फंडने संशोधन एजन्सी YouGov सोबत सहयोगाने डीएसपी विन्वेस्टर पल्स २०२२ सर्वेक्षणाचे निष्कर्ष सादर केले. या सर्वेक्षणामधून महिला व पुरुषांमधील गुंतवणूक वर्तन आणि गुंतवणूकीचे निर्णय घेताना त्यांच्या वृत्ती व सहभागातील फरक निदर्शनास आला आहे.
स्टडीमधून निदर्शनास आले की, महिलांच्या (२७ टक्के) तुलनेत पुरुष (४० टक्के) अधिककरून स्वत:हून गुंतवणूक निर्णय घेतात (व्यावसायिक सल्लागाराचा सल्ला न घेता). गुंतवणूकीचे निर्णय घेणाऱ्यांपैकी पुरूषांच्या (४८ टक्के) तुलनेत महिला (६७ टक्के) अधिककरून आपल्या जोडीदाराचा सल्ला घेतात. महिलांच्या (१० टक्के) तुलनेत पुरुषांच्या दुप्पट प्रमाणाने (२६ टक्के) गुंतवणूकीचे निर्णय घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांचा सल्ला घेतल्याचे सांगितले.
सर्वेक्षणातून निदर्शनास आले की, पती (२१ टक्के) त्यांच्या वडिलांच्या (१२ टक्के) तुलनेत महिलेला गुंतवणूकीचे ओळख करून देण्यामध्ये मोठी भूमिका बजावतात; दुसरीकडे, बहुतांश पुरूषांनी स्वयं-शिक्षित गुंतवणूकदार असल्याचा दावा केला. अधिकाधिक पुरूषांनी दावा केला की त्यांना त्यांचे वडिल (पुरूषांसाठी १५ टक्के व महिलांसाठी १२ टक्के), मित्र व सामाजिक क्षेत्र (पुरूषांसाठी १८ टक्के व महिलांसाठी ११ टक्के) यांनी गुंतवणूकांबाबत ओळख करून दिली.
सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ३२ टक्के महिलांनी व्यावसायिक आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतला, तर ३६ टक्के पुरुषांनी तसे केले. बहुतांश पुरुष (७९ टक्के) आणि महिला (७८ टक्के) म्हणाले की आर्थिक सल्लागारांचा विचार करताना ते जेंडर न्यूट्रल होते, तर दुसरे सर्वात मोठे प्राधान्य पुरुष (१५ टक्के) व महिला (१३ टक्के) या दोघांमध्ये पुरुष सल्लागारांना होते. महिला आर्थिक सल्लागारांना पुरुषांपेक्षा (६ टक्के) महिलांनी (८ टक्के) किंचित जास्त पसंती दिली.
सर्वेक्षणाचा एक मनोरंजक पैलू असा होता की, बहुतांश प्रतिवासादकांनी (जवळपास ७० टक्के पुरुष व महिला प्रतिवासादक) सांगितले की, ते त्यांच्या मुलाला व मुलीला गुंतवणूकीबद्दल वेगळ्या पद्धतीने सल्ला देतात/ देतील. खरंतर, ४१ टक्के पालकांनी सांगितले की त्यांच्या मुलाच्या लिंगानुसार त्यांची स्वतःची गुंतवणूक धोरणे भिन्न असतील.
उत्साहवर्धक निरीक्षण असे होते की, सर्वेक्षण केलेल्या जवळ-जवळ अर्ध्या (४५ टक्के) पुरुष व महिलांनी सांगितले की ते कोविड नंतर अधिक गुंतवणूक करत आहेत. महामारीमुळे पैशाचे अधिक महत्त्व समजण्यासोबत पूर्वीपेक्षा अधिक परतावा मिळण्याचे महत्त्व देखील समजले. अॅप्सद्वारे गुंतवणूकीची सुलभता हे पुरुष आणि महिला दोघांनीही कोविडनंतर अधिक गुंतवणूक करण्याचे प्रमुख कारण म्हणून नमूद केले. कोविड नंतर कमी गुंतवणूक करत आहेत असे म्हणणाऱ्यांपैकी, पुरुष व महिला दोघांनही कोविडनंतर कमी गुंतवणूकीसाठी कमी उत्पन्न व इच्छा ही प्रमुख कारणे सांगितली. पण महिलांपेक्षा (२२ टक्के) अधिक पुरूषांनी (२८ टक्के) कमी गुंतवणूक करण्याचे कारण म्हणून नोकरी गमावणे/व्यवसाय बंद करणे हे सांगितले.
स्टडीमधून निदर्शनास आले की, पुरूष व महिलांसाठी अव्वल गुंतवणूक ध्येये मोठ्या प्रमाणात समान आहेत: राहणीमानाचा दर्जा सुधारणे, निवृत्तीनंतरच्या काळासाठी पुरेशी बचत करणे आणि मुलांच्या शिक्षणासाठी बचत करणे. पण अधिक महिलांनी (४५ टक्के) पुरूषांच्या (४० टक्के) तुलनेत मुलांच्या शिक्षणसाठी बचत करण्याला अव्वल ध्येय मानले. अधिक पुरूषांनी कर्जमुक्त जीवन जगण्याची (पुरूषांसाठी २६ टक्के व महिलांसाठी २३ टक्के) इच्छा व्यक्त केली आणि अव्वल ध्येय म्हणून त्यांचा स्वत:चा उद्यम सुरू करण्याला प्राधान्य दिले (पुरूषांसाठी २६ टक्के व महिलांसाठी २३ टक्के).
डीएसपी विन्वेस्टर पल्स २०२२ हा डीएसपी म्युच्युअल फंडाच्या विन्वेस्टर उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम महिलांना त्यांच्या गुंतवणूकीचे निर्णय घेण्यास प्रोत्साहित करतो आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतो, ज्यामुळे त्या त्यांच्या आर्थिक नियंत्रणासाठी इतर कोणावर अवलंबून राहणार नाहीत. डीएसपी पात्र आर्थिक तज्ञांकडून सल्ला घेऊन महिलांना जबाबदारी घेण्यास आणि त्यांच्या पैशाची मालकी घेण्यास प्रोत्साहित करते.
सर्वेक्षणात १० शहरांमधील (४ महानगरे: मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि ६ मिनी-मेट्रो: इंदूर, कोची, पाटणा, चंदीगड, लुधियाना व अमृतसर) ४,६२५ महिला आणि पुरुषांचा समावेश होता. या स्टडीमध्ये २५ ते ६० वर्षे वयोगटातील गुंतवणूकीच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या पुरुष आणि महिलांचे प्रतिसाद घेतले आहेत. सर्वेक्षणासाठी फील्डवर्क ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत करण्यात आले. सहभागींमध्ये सध्या काम करत असलेल्या किंवा गतकाळात किमान २ वर्षे काम केलेल्या व्यक्तींचा समावेश होता, त्यामध्ये अविवाहित, मुले नसलेले विवाहित किंवा मुले असलेले विवाहित यांचा समावेश होता
डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा. लि. च्या उपाध्यक्ष अदिती कोठारी देसाई म्हणाल्या, “महिला गुंतवणूकदार जमातीच्या उदयाबाबत मी खूप सकारात्मक आहे. मला विश्वास आहे की, अधिक महिलांना आता गुंतवणूकीचे योग्य निर्णय घेण्याचा विश्वास आहे, पण डीएसपी विन्वेस्टर पल्स २०२२ ने निदर्शनास आणल्याप्रमाणे निश्चितच खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. माझ्यासाठी सर्वेक्षणाचा एक महत्त्वपूर्ण पैलू असा होता की महिलांना त्यांच्या वडिलांनी नाही, तर पतींनी गुंतवणूकीची ओळख करून दिली आहे. मी सर्वसाधारणपणे पालकांना व विशेषत: वडिलांना आवाहन करेन की त्यांनी लहान वयातच त्यांच्या मुलींसोबत पैसे आणि गुंतवणूक याविषयी संभाषण करावे. यामुळे पुढची पिढी त्यांच्या गुंतवणूकीच्या निर्णयांसह हुशार होईल. तसेच, मला विश्वास आहे की, योग्य व्यावसायिक गुंतवणूक सल्ला महिलांना त्यांच्या नशिबावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करण्यात मोठा बदल घडवून आणेल. यासंदर्भात आमचे एमएफडी आणि सल्लागार-भागीदार पुढेही महत्त्वाची भूमिका बजावत राहतील.”
डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स बाबत
डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स ही कंपनी २५ वर्षांहून अधिक काळापासून गुंतवणूकीत उत्कृष्ट कामगिरी करत आली आहे. आज आम्ही विविध क्षेत्रांतील ३५ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांच्या पैशाचे व्यवस्थापन करत आहोत. यांमध्ये मेहनती पगारदार व्यक्ती, हाय-नेट-वर्थ व्यक्ती, अनिवासी भारतीय, लघु व मध्यम व्यवसायांचे मालक, मोठ्या खासगी व सार्वजनिक कंपन्या, ट्रस्ट आणि परदेशी संस्थांचा समावेश आहे. आमच्या सर्व गुंतवणूकदारांसाठी संपदासंचय करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावतो, याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही नेहमीच एका हेतूसह काम करत राहू. आमच्या गुंतवणूकदारांच्या आयुष्यांमध्ये बदल घडवून आणणे ही आमची जबाबदारी आहे.
डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सला १६० हून अधिक जुन्या डीएसपी ग्रुपचे पाठबळ आहे. गेल्या दीड शतकापासून या ग्रुपमागे असलेले कुटुंब भांडवली बाजारांच्या वाढीत व त्यातील प्रोफेशनलिझममध्ये तसेच भारतातील पैसा व्यवस्थापन व्यवसायात प्रभावी भूमिका बजावत आहे. डीएसपी ग्रुपचे नेतृत्व सध्या श्री. हेमेंद्र कोठारी यांच्याकडे आहे.
आमच्या गुंतवणूकदारांचे हित हे नेहमीच आमच्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी राहील आणि त्यांच्यासाठी जे काही सर्वोत्तम आहे ते अविश्रांतपणे करण्यावर आमचा भर राहील, कारण ते त्यांच्या भल्यासाठी गुंतवणूक करत आहेत #InvestForGood.
अधिक माहितीसाठी dspim.com या वेबसाइटला भेट द्या.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:
डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड
अरुण राजेंद्रन
ईमेल: arun.rajendran@dspim.com
मो.: +919833005393