मुंबई बुधवार : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे अँड प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना आता बाळासाहेबांची शिवसेना आणि दलित पँथर एकत्र येणार असल्याचे ‘विश्वासनीय सूत्र हाती आले आहे .त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पून्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. लवकरच दलित पँथरची राज्य ‘कार्यकारिणी सदस्य बाळासाहेबांच्या शिवसेनेला पाठींबा देणार असल्याचे सुतोवाच शिंदे गटाचे नेते व राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी केले आहे. त्यामुळे शिंदे गटाला आता निळा झेंडा साथीला मिळणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भारतीय जनता पार्टीची युती आहे. त्यामुळे भाजपाला निळ्या झेंड्याची साथ मिळाली आहे, चार महिन्यापूर्वी राज्यात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार राज्यात अस्तित्वात आले. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत.आता तर निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांना मान्यता दिली आहे.
आता निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठावले आहे. त्यामुळे दोन्ही गटाला वेगवेगळी चिन्हे आयोगाने दिली आहेत. प्रत्येक पावलावर शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटावर बाजी मारली असून त्यांना अडचणीत आणले आहे. मागील आठवडयात प्रबोधन डॉट कॉम च्या नव्या स्वरुपातील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अॅड प्रकाश आंबेडकर एकत्र आले. परंतू ते एकत्र येण्याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजगृहावर प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन शिवसेना ठाकरे गटात खळबळ माजवून दिली होती. त्यामुळे ठाकरे आंबेडकर एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती
आणि आता तर एकेकाळची लढवयी संघटना दलित पॅथर आता बाळासाहेबांची शिवसेनेला पाठींबा देणार असल्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांनी जाहीर करणार असल्याचे सांगितल्यामुळे ठाकरे गटालापुन्हा एकदा धक्का देण्याचे तयारीत आहे.