कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आरोपांनंतर राहुल गांधींच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात आली. यात सर्वात मोठे आंदोलन मनसेने केले. मनसेचे कार्यकर्ते शेगावमधील सभेतही गेले होते, तिथे त्यांना राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले त्यासाठी राज ठाकरेंचे आभार माननण्यासाठी वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे.