मुंबई, १४ नोव्हेंबर २०२२ : वर्तमानपत्र आणि इतर मुद्रण क्षेत्राशी संबंधित ऑल इंडिया प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने त्यांच्या यजमानपदाखाली येत्या १७, १८, १९ नोव्हेंबर 2022 रोजी नेस्को – मुंबई प्रदर्शन केंद्र येथे ‘एशिया कोट + इंक’ या प्रदर्शन आणि व्यापार मेळ्याच्या आयोजित करण्यात आला आहे. .
ऑल इंडिया प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, (एआयपीआयएमए) ही १९५३ मध्ये स्थापन झालेली संघटना, सध्या श्री. राघवन श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे आणि तिच्या कार्यकारी समितीवर भारतातील सर्व आघाडीच्या शाई कंपन्यांकडून प्रतिनिधित्व केले जाते.
यावेळी , AIPIMA चे उपाध्यक्ष डॉ. राघव राव म्हणाले की, “सुमारे ३०० शाई उत्पादक संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत ज्यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली (एनसीआर), तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात आहे. शाई उद्योगाद्वारे झालेली रोजगार निर्मिती ही ‘एआयपीआयएमए’च्या अंदाजानुसार, सुमारे १००,००० लोकां थेट आणि उत्पादन शृंखलेतील भागीदारांसह आणखी सुमारे १२०,००० लोकांना यातून नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. देशातील संपूर्ण मुद्रण उद्योग जवळपास १५ कोटी लोकांना रोजगार देतो, ज्यांना छपाई प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाईची नितांत आवश्यकता असते.” मोठ्या ६ बहुराष्ट्रीय शाई कंपन्यांकडे जवळपास ६५ टक्के बाजार हिस्सा आहे आणि उर्वरित ३५ टक्के हिस्सा हा लहान ते मध्यम आकाराच्या भारतीय शाई उत्पादक कंपन्यांकडे आहे. भारतात बहुराष्ट्रीय शाई उत्पादकांसह ३०० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापैकी बरेच उत्पादक त्यांची उत्पादने परदेशात निर्यात करतात. वर्तमानपत्र, मासिके, खाद्य पॅकेजिंग आणि सर्व प्रकारच्या पॅकेजिंगच्या छपाईसह मुद्रण शाईच्या गुणवत्तेची आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगतता तपासण्याची सुविधा उपलब्ध असल्यास भारत हे मुद्रण शाई उत्पादनाचे जगातील प्रमुख केंद्र बनू शकते.
यावेळी आशिया कोट इंक शोचे सचिव रवींद्र गांधी म्हणाले की, ”असोसिएशनने भारतीय मानक आयएस : १५४९५ ची पूर्तता करण्यासाठी सर्व नियामक अनुपालनांसह सज्जता केली आहे. असोसिएशनने नुकतेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग सोबत एक सामंजस्य करार केला आहे, ज्यामुळे मुद्रण शाई क्षेत्रातील सूक्ष्म, लहान आणि मध्यम कंपन्यांना जागतिक मानकांशी सुसंगत सक्षमता आणि गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी एक अद्वितीय मुद्रण शाई चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. भारतातील आणि जागतिक स्तरावर बहुराष्ट्रीय शाई कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय शाई कंपन्यांकडे संसाधनांचा अभाव आहे. जागतिक स्तरावर आवश्यक मानकांशी सुसंगत मुद्रण शाईच्या गुणवत्तेची चाचणी करण्यासाठी भारतात कोणतीही मान्यताप्राप्त स्वतंत्र चाचणी प्रयोगशाळा नाही. याच कारणाने ऑल-इंडिया प्रिंटिंग इंक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयपीआयएमए) ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगच्या सहकार्याने प्रिंटिंग इंक्सच्या चाचणीसाठी चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी पावले टाकली आहेत.”
रेजिन, अॅडिटीव्ह, सॉल्व्हंट्स, पिगमेंट्स, मोनोमर्स यांचे पुरवठादार, मशीनरी आणि उपकरणांचे निर्माते व विक्रेते आणि मुद्रण शाईच्या उत्पादकांनी आशियातील सर्वात मोठ्या लेपन आणि शाई उद्योग प्रदर्शनी ‘एशिया कोट + इंक शो’मध्ये सहभागी झाले आहेत.
या उद्योग क्षेत्राविषयी माहिती व ज्ञानाच्या प्रसारासाठी, असोसिएशनने अभियांत्रिकी महाविद्यालये, पॅकेजिंग संस्था, मुद्रण संस्था यातील विद्यार्थ्यांना प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमंत्रित केले आहे, जेणेकरून त्यांना मुद्रण शाई उद्योगातील सध्याच्या घडामोडी जाणून घेता येतील. त्याचवेळी, ‘एआयपीआयएमए’द्वारे १६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक हॉटेल कोर्टयार्ड बाय मॅरियट येथे “नेक्स्ट जनरेशन प्रिंटिंग इंक अँड टेक्नॉलॉजी, इश्यू-ट्रेंड्स अँड वे फॉरवर्ड” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
मुद्रण शाई क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी मार्गदर्शक व बोधप्रद ठरेल अशा सादरीकरणासह, जपान, जर्मनी, ब्रिटन, अमेरिकेमधून तज्ज्ञ, अनुभवी वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
या मेळ्याला संपूर्ण भारतभरातून मुद्रण शाई उत्पादक आणि या उद्योगाचे कच्चा माल पुरवठादार या दोन्ही क्षेत्रांतून मोठ्या संख्येने पाहुण्यांच्या उपस्थिती अपेक्षित आहे.
यावर भाष्य करताना AIPIMA चे अध्यक्ष श्री राघवन श्रीधरा म्हणाले की, “योगायोगाने, यावेळी जगभरातील मुद्रण शाई उत्पादक हे कच्चा माल आणि शाईच्या पुरवठ्यासाठी भारताकडे डोळे लावून बसले आहेत. , कारण युरोपातील भू-राजकीय तणाव आणि डगमगलेल्या आर्थिक परिस्थितीत, चीनला एक प्रभावी आणि विश्वासार्ह अशा पर्यायाचा शोध घेणे हे संपूर्ण जगासाठी क्रमप्राप्त ठरले आहे. ‘एआयपीआयएमए’ने भारतातील शाई उद्योगाची प्रतिनिधी संस्था म्हणून लहान आणि मध्यम आकाराच्या शाई उत्पादक कंपन्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेषत: उत्पादन दर्जा राखला जाण्यासाठी प्रयोगशाळेतील उपकरणे आणि उच्च प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये गुंतवणुकीसाठी पाठबळ देण्याचे प्रयत्न आहेत.” १९९० च्या उत्तरार्धापर्यंत, भारतात फक्त एक बहुराष्ट्रीय शाई उत्पादन कंपनी होती, परंतु गेल्या २५ वर्षांत अनेक युरोपीय, जपानी आणि अमेरिकी प्रिंटिंग इंक आणि कोटिंग उत्पादकांनी भारतात प्रवेश केला आहे.”
जागतिक शाई बाजारपेठ अंदाजे १५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या (संदर्भ – इंक वर्ल्ड) घरात जाणारी आहे. त्या तुलनेत भारतीय शाई बाजारपेठेचे आकारमान अंदाजे १ अब्ज डॉलर (संदर्भ – प्रिंट वीक) इतके आहे.
असोसिएशनच्या सदस्यांनी भारत आणि जगभरातील शाई उद्योगातील सर्व सहभागींना या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी आमंत्रित केले आहे . १७, १८, १९ नोव्हेंबर २०२२ रोजी नेस्को, मुंबई येथे आशिया कोट प्रदर्शनाला जरूर भेट द्या असे आवाहन आयोजकांनी केले.