मुंबईकरांना #BeatsOfTheStreets साजरे करणाऱ्या दोन-दिवसीय फेस्टिवलदरम्यान ब्रीझर विविड शफल सीझन ६ येथे भारतातील सर्वोत्तम हिप हॉप टॅलेण्ट पाहायला मिळणार
मुंबई, : ब्रीझर विविड शफल (बीव्हीएस) या भारतातील सर्वात मोठ्या हिप हॉप फेस्टिवलने १२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी उत्साहवर्धक ऑन-ग्राऊंड अनुभवासह मुंबईकरांना #BeatsOfTheStreets वर नृत्याचा आनंद देण्यासाठी सलग सहाव्या सीझनच्या लॉन्चची घोषणा केली आहे. बीव्हीएससोबत दीर्घकाळापासून संलग्न असलेल्या भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक क्रिती सेनन देखील प्रेक्षकांच्या भेटीला उपस्थित राहणार आहे.
सांस्कृतिक स्वरूपामध्ये रूपांतरित झालेला हिप हॉप फेस्टिवल ब्रीझर विविड शफल देशातील हिप हॉप संस्कृतीला अधिक महत्त्व मिळवून देणाऱ्या कलाकारांना प्रशंसित करण्यास सज्ज आहे. मुंबईमध्ये या उत्साहाला आणत फेस्टिवलमध्ये भारतातील काही सेन्सेशनल हिप हॉप टॅलेण्ट्सचे उत्साहवर्धक परफॉर्मन्स पाहायला मिळतील, ज्यामुळे हा सीझन पूर्वीपेक्षा अधिक मोठा व सर्वोत्तम असणार आहे. फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी विक्ड सनीचे हार्ड-हिटिंग बार्स, हिप हॉप, ट्रॅप व फंक बिगी डीजे प्रूफ, तसेच रॅपर, संगीतकार व यूट्यूब नॉकआऊट डिनो जेम्स यांचे परफॉर्मन्स पाहायला मिळतील. दुसऱ्या दिवशी हिप हॉप उत्साहींना रॅपर्स पवन, अग्सी व कृष्णा, तसेच रूप सुपरस्टार रफ्तार यांच्यासह मनोरंजनाची पर्वणी पाहायला मिळेल.
बकार्डीच्या आरटीडी (रेडी टू ड्रिंक), एएमईए (एशिया, मिडल ईस्ट, आफ्रिका)च्या प्रादेशिक ब्रॅण्ड व श्रेणी प्रमुख आरती हजेला म्हणाल्या, ‘’मागील दशकापासून भारतातील हिप हॉपने अपवादत्मकरित्या प्रगती केली आहे, जेथे दररोज संगीत, कला व नृत्याचे नवीन टॅलेण्ट्स उदयास येताना पाहायला मिळत आहेत. आमच्या संस्कृतीशी संलग्न असलेल्या ग्राहकांना आवडणाऱ्या हिप हॉपला साजरे करण्याच्या मनसुब्यासह आम्ही मुंबईमध्ये दोन-दिवसीय फेस्टिवलसह ब्रीझर विविड शफलचा सहावा सीझन घेऊन येत आहोत. उत्साहवर्धक सादरीकरणे आणि स्ट्रीटवेअर पॉप-अप्ससह #BeatsOfTheStreets हिप हॉपला एक मानवंदना असणार आहे. आम्ही भारतात हिप हॉप मिशनला साजरे करण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि कलाकार व उत्साहींना हिप हॉपची क्षमता अनुभवण्यास व आत्मसात करण्यास मार्ग निर्माण करणे सुरूच ठेवू.’’
#BeatsOfTheStreets चा स्तर उंचावत बीव्हीएस प्रेक्षकांना हिप हॉपच्या विश्वात घेऊन जाईल, जेथे त्यांना एकाच छताखाली त्यांचे नृत्यकौशल्य दाखवण्यास, स्ट्रीट स्टाइल नृत्याला अपडेट करण्यास प्रोत्साहित केले जाईल आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. हिप हॉपमागील कौशल्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी उत्साहींसाठी नृत्य व संगीतावर स्कूल ऑफ शफल वर्कशॉप देखील असणार आहे.
मुंबईतील दोन-दिवसीय फेस्टिवल व्यतिरिक्त बीव्हीएस ५ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये ब्लॉक पार्टी आणि १९ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीमध्ये आणखी एक ब्लॉक पार्टीचे आयोजन करण्यास सज्ज आहे, ज्यामध्ये भारतातील हिप हॉप संस्कृतीच्या विकासाला साजरे करण्यात येईल.
नॉडविन गेमिंगचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले, “सर्वात आकर्षक व उत्साहवर्धक फेस्टिवल ब्रीझर विविड शफलचा भाग असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. हिप हॉप देशामध्ये जवळ-जवळ एक संस्कृती बनली आहे आणि कलाकार देखील अशा फेस्टिवल्सची वाट पाहत असतात, जेथे ते त्यांचे टॅलेण्ट दाखवण्यासोबत त्यांना योग्य संधी देखील मिळू शकते. बीव्हीएस हा एक मंच आहे, जेथे हिप हॉप व्यक्तींना उत्साहित व मंत्रमुग्ध करण्यासाठी एकत्र येते. #BeatsOfTheStreets मध्ये उत्साहींना विविध शैलींचा भाग होण्याची संधी मिळू शकते, तसेच कलात्मक उत्साहाचा आनंद घेता येऊ शकतो. हा फेस्टिवल देशभरातील काही असाधारण टॅलेण्टचा शोध घेण्यासाठी व्यासपीठ राहिले आहे आणि आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की, हा फेस्टिवल हिप हॉप चाहत्यांसाठी सर्वात लोकप्रिय गंतव्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.’’
बॉलिवुड अभिनेत्री व बीव्हीएस सीझन ६ च्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर क्रिती सेनन यांनी हिप हॉपप्रती त्यांच्या आवडीबाबत सांगितले. त्या म्हणाल्या, ‘’माझ्यासाठी हिप हॉप संगीतापेक्षा अधिक आहे. यामधून स्वत:ला अभिव्यक्त करायला मिळते आणि म्हणूनच ते विशेष आहे. मला पुन्हा एकदा भारतातील सर्वात मोठा हिप हॉप फेस्टिवल ब्रीझर विविड शफलचा भाग असल्याने सन्माननीय वाटते, जेथे ते त्यांचा सहावा सीझन साजरा करत आहेत. दरवर्षी मंचावर टॅलेण्टचा स्तर आणि उत्साहपूर्ण परफॉर्मन्स पाहायला मिळणे अविश्वसनीय आहे. मला या व्यासपीठाशी संलग्न असण्याचा आनंद होत आहे, जो अनेक कलाकारांसाठी त्यांची कौशल्ये निपुण करण्याची, आत्मविश्वास निर्माण करण्याची आणि स्वत:ला अभिव्यक्त करण्याची संधी देतो. मी यावर्षी पुन्हा एकदा मुंबईमध्ये ब्रीझर विविड शफलचा आनंद घेण्याची आणि भारतातील उत्साहपूर्ण हिप हॉप समुदायासह #BeatsOfTheStreets ला साजरे करण्यास अत्यंत उत्सुक आहे.’’
भारतातील हिप हॉप टॅलेण्टला अधिक निपुण करण्याच्या प्रयत्नामध्ये बीव्हीएस डिजिटल डान्स बॅटलचे आयोजन करत आहे, ज्याचे परीक्षण आंतरराष्ट्रीय दिग्गज मेरी पॉपिन्स, बौबू आणि आऊट्रेज करणार आहेत. आकर्षक पुरस्कारांमध्ये ६ लाख रूपयांचे बक्षीस आणि क्रिती सेननसोबत भेट यांचा समावेश आहे.
डिजिटल डान्स बॅटलबाबत अधिक माहितीसाठी येथे (here) क्लिक करा.
थिरकण्यास सज्ज राहा! तिकिटे येथे उपलब्ध आहेत: Insider.in – BREEZER Vivid Shuffle Mumbai.
मुंबई फेस्टिवलबाबत:
१२ व १३ नोव्हेंबर २०२२
डुबलिन स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी, कुर्ला, मुंबई
इतर सर्व इव्हेण्ट-संबंधित घोषणांबाबत अपडेट राहण्यासाठी BREEZER Vivid Shuffle व NODWIN Gaming सोशल्सना फॉलो करा. #BREEZERVividShuffle #BeatsOfTheStreets.
ब्रीझर विविड शफल बाबत
२०१७ मध्ये लॉन्च करण्यात आलेली ब्रीझर विविड शफल ही भारतातील सर्वात मोठी हिप हॉप लीग आहे, जिचा स्ट्रीट आर्ट, संस्कृती व परफॉर्मन्सला राष्ट्रीय मंच देण्याचा मनसुबा आहे. हे भारतातील उदयोन्मुख हिप हॉप मिशनसाठी व्यासपीठ आहे. तळागाळातील टॅलेण्टचे प्रतिनिधित्व करण्याचा आणि समुदायाला खरेखुरे मनोरंजन देण्याचा या मिशनचा मनसुबा आहे. पाच यशस्वी सीझन्सनंतर ब्रीझर विविड शफल आता सहाव्या सीझनला घेऊन येत आहे, जेथे त्यांचा सर्वात मोठा ब्रॅण्ड-केंद्रित हिप हॉप समुदाय निर्माण करण्याचा उद्देश आहे. मागील पाच वर्षांमध्ये ब्रीझर विविड शफल देशातील विविध शहरांपर्यंत पोहोचला आहे आणि २०१९ मध्ये बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला होता. मागील दोन वर्षांपासून बीव्हीएसचे व्हर्च्युअली आयोजन करण्यात आले. यंदा ते ऑन-ग्राऊंड परतले आहे अणि पूर्वीपेक्षा अधिक मोठे व सर्वोत्तम असण्याची खात्री देते.