‘ती’ इतकी भारावून गेली की, ‘त्या’ क्षणी काय बोलायचं? हेच तिला कळत नव्हतं, तिने मग….
त्या मुलीच्या हावभावावरुन तिचा….
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज भारत आणि नेदरलँडमध्ये सामना झाला. ही मॅच सुरु असताना युवकाने मुलीला प्रपोज केला. आयसीसीच्या अधिकृत पेजवर हा व्हिडिओ शेयर करण्यात आलाय. या युवकाने गुडघ्यावर बसून तू माझ्याशी लग्न करशील का? अशी मागणी घातली. प्रियकराने अशा प्रकारे प्रपोज केल्याचे पाहून ती मुलगी सुद्धा भारावली. आश्चर्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. एकूणच त्या मुलीच्या हावभावावरुन तिचा होकार असल्याचे संकेत मिळाले.
कमेंटमध्ये काय म्हटलय?
ग्राऊंडमध्ये ही लव्हस्टोरी सुरु असताना प्रेक्षकांचा एकच गोंगाट सुरु होता. ते टीम इंडियासाठी चियर करत होते. हा व्हिडिओ शेयर केल्यानंतर 7 लाखापेक्षा जास्तवेळ पाहिला गेलाय. या व्हिडिओला 1 लाखापेक्षा जास्त लाइक्स असून अनेक कमेंटसचा वर्षाव आहे.
‘हा खरा मॅन ऑफ द मॅच आहे’, असं एका व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटलं आहे. हा परफेक्ट प्लान होता, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. ‘हे आधी करा. हॅप्पी स्टेडियम रिंग सेरेमनी’ अशी तिसऱ्याने कमेंट केलीय. ‘स्टेडियम ही प्रपोज करण्याची नवीन जागा आहे’, असं चौथ्याने म्हटलय. बहुतेक जण इमोजीमधून व्यक्त झाले आहेत.