‘निरवधी’, ‘सुटका’, ‘एप्रिल फुल’, ‘फक्त महिलांसाठी’, ‘थ्री चिअर्स’, ‘एकदा येऊन तर बघा’ आणि ‘ती मी नव्हेच’ या सात कलाकृतींची घोषणा
कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी हातमिळवणी केली.
मुंबई : मराठी मनोरंजन विश्व हे अधिकाधिक व्यापक बनत चाललेलं आहे. याचाच परिपाक म्हणून इतर भाषांमधील निर्मातेही मराठी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत. याचीच प्रचिती बुधवारी मुंबईत पार पडलेल्या एका रंगारंग सोहळ्यात आली. हिंदीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखन आणि निर्मिती करणा-या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी एकत्रितपणे आपल्या आगामी सात नव्या चित्रपटाची घोषणा केली.
हिंदीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचं लेखन आणि निर्मिती करणाऱ्या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अॅण्ड पिक्चर्स प्रॉडक्शन्स तसंच राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मिती संस्थांनी आपल्या आगामी सिनेमांची घोषणा केली. हे सात मराठी सिनेमे आहेत. त्यातल्या ती मी नव्हेच या मराठी सिनेमात उर्मिला मातोंडकर, श्रेयस तळपदे आणि निनाद कामत यांच्या भूमिका आहेत. परितोष पेंटरनं याचं लेखन केलं आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अनेक वर्ष सिनेमात दिसलीच नाही. काही काळ ती राजकारणातही आली होती. पण तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कालच उर्मिलाच्या मराठी सिनेमाची घोषणा झाली. २०१४ मध्ये उर्मिलाचा आजोबा हा मराठी सिनेमा खूप गाजला होता. आता ती पुन्हा मराठी सिनेमात भूमिका करायला सज्ज झाली आहे.
उर्मिला सध्या ‘डान्स इंडिया डान्स- सुपर मॉम्स’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री दहा वर्षांनी पुन्हा एकदा रिॲलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत बसली आहे. याबाबत तिचा अनुभव विचारला असता उर्मिला म्हणते की, ‘कुठलीही भारतीय स्त्री जन्माला आल्यापासून मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई अशा विविध जबाबदाऱ्या निभावत असते. हे सगळं करताना तिचे विचार, स्वप्नं, अपेक्षा, आकांक्षा हरवून जातं. तिच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम ‘डान्स इंडिया डान्स-सुपर मॉम्स’ हा मंच करतंय. अशा कार्यक्रमाचा मी भाग असल्याचा मला आनंद आहे.
‘निरवधी’ चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असून त्यात सुबोध भावे, उपेंद्र लिमये आणि गौरी इंगवले हे प्रमुख कलाकार बघायला मिळणार आहेत. ‘सुटका’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करणार असून यात स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे आणि ओंकार राऊत या कलाकारांच्या मुख्य भूमिका बघायला मिळणार आहेत. ‘एप्रिल फुल’ ही एक थ्रिलर कॉमेडी स्वरुपाची फिल्म असून त्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव करणार आहे. यात सिद्धार्थ जाधव, अंकित मोहन, रसिका सुनिल आणि रिंकू राजगुरु हे कलाकार मुख्य भूमिकेत असतील.
मृणाल कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटात सई ताम्हणकर, शिवानी रंगोळे, प्रसाद ओक आणि वंदना गुप्ते हे कलाकार बघायला मिळणार आहेत. ‘थ्री चिअर्स’चे लेखन दिग्दर्शन परितोष पेंटर यांचे असणार आहे आणि यात सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, जयेश ठक्कर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोणारी, रेशम टिपणीस, विजय पाटकर आणि कॉमेडी किंग जॉनी लिव्हर बघायला मिळणार आहेत. ‘एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसाद खांडेकर यांनी सांभाळली असून या चित्रपटाद्वारे मोठया पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करतोय. यात सयाजी शिंदे, गिरिश कुलकर्णी, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, वनिता खरात, राजेश शिरसाटकर, ओंकार भोजने, गौरव मोरे आणि पंढरीनाथ कांबळे आदी कलाकार बघाला मिळणार आहेत.