मुंबई, २६ ऑगस्ट २०२२: जोश, या भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणाऱ्या आणि सर्वाधिक सहभाग असलेल्या शॉर्ट-व्हिडीओ अॅपने नुकताच आपल्या जोश ऑल स्टार्स या महत्त्वाच्या उपक्रमाचे यश साजरे करण्यासाठी दिमाखदार सोहळा आयोजित केला होता. या उपक्रमाचे दुसरे पर्व – जोश ऑल स्टार्स २०२२ चे आज मुंबईत सादरीकरण करण्यात आले. जोश ऑल स्टार्स ही शॉर्ट-व्हिडीओ क्रिएटर्ससाठीची भारतातील सर्वात मोठी आणि आजवरची पहिली अधिकृत प्रशिक्षण अॅकॅडमी आहे. हा उपक्रम सादर केल्यापासून क्रिएटर समुदायाकडून त्यास प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
या सोहळ्यात अनेक जोश क्रिएटर्स उपस्थित होते. यावेळी जोश ऑल स्टार्स उपक्रमातील २०२१ च्या प्रशिक्षणार्थींसाठी पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या व्यासपीठावरील विविध महत्त्वाच्या यशाबद्दलही जोश क्रिएटर्सना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात जोश मेंटॉर्सच्या मार्गदर्शनपर सत्राचाही समावेश होता. सर्जनशील अभिव्यक्तीचे भविष्यातील माध्यम असलेले शॉर्ट व्हिडीओ, या व्यासपीठावरील आर्थिक उत्पन्नाच्या संधी, जोश अॅपवरील नवी वैशिष्ट्ये आणि अशा इतर गोष्टींची माहिती क्रिएटर्सना देण्यात आली. त्यामुळे अॅपवरील त्यांच्या प्रवासाला चालना मिळेल आणि त्यांना भविष्यात विविध संधी निर्माण करण्यातही साह्य होईल. या सोहळ्याला अरहान अन्सारी, हर्षा खांडेपारकर, सुफियान खान, निदा खान, इशान मसीह, मोहक मनघानी आणि मुकुल चौधरी अशा लोकप्रिय जोश क्रिएटर्सनी हजेरी लावली. शिवाय, त्यांनी अनोखा कंटेंट निर्माण करण्यासाठी इतर क्रिएटर्ससोबत सहकार्यही केले.
सहभागींना कंटेंट तयार करण्यातील सर्वंकष माहिती आणि ज्ञान देऊन भारतातील भविष्यातील १०००० क्रिएटर्सचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने जोश ऑल स्टार्स उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या पर्वाप्रमाणेच जोश ऑल स्टार्स २०२२ मध्ये क्रिएटर्सना खास पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल. या सहा आठवड्यांच्या कार्यक्रमात विविध पातळ्यांवरील वैयक्तिक ग्रूमिंग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मोठ्या प्रमाणावरील प्रमोशनचा समावेश आहे. प्रत्येक विभागातील आघाडीच्या कंटेंट क्रिएटर्सना जोशवरील आगामी विविध मोहिमांचा भाग होण्याची संधी दिली जाईल.
वर्से इनोव्हेशनचे चीफ मार्केटिंग ऑफिसर समीर वोरा म्हणाले, “मागील काही वर्षांत शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत आणि आपल्या प्रेक्षकांसोबत परिणामकारक आणि त्यांना गुंतवून ठेवणारा संवाद साधण्यासाठी ब्रँड्सही मोठ्या प्रमाणावर क्रिएटर्सचे साह्य घेत आहेत. त्यामुळे ब्रँड्ससोबतचे सहकार्य, इन्फ्लूएन्सर मार्केटिंग आणि लाइव्ह कॉमर्स अशा माध्यमातून क्रिएटर्ससाठी उत्पन्नाच्या अनोख्या संधी निर्माण झाल्या आहेत. जोश ऑल स्टार्ससह आम्ही आमच्या क्रिएटर्सना त्यांचा समुदाय तयार करणे, त्यांचा ब्रँड निर्माण करणे, उत्पन्नाच्या संधींचा वेध घेणे आणि सर्वसमावेशक ग्रूमिंग प्रोग्राममधून उद्योजक बनण्यात साह्य करत आहोत. जोश ऑल स्टार्सच्या उत्तीर्ण झालेल्या बॅचचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि या नव्या सहभागींना रंजक अनुभव द्यावा, यासाठी प्रयत्न करू.”
जोशच्या क्रिएटर अॅण्ड कंटेंट इकोसिस्टमचे प्रमुख सुंदर वेंकटरामन म्हणाले, “कंटेंट क्रिएटर समुदाय वेगाने वाढत आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे एंगेजमेंटसाठी नवे मार्गही खुले होत असल्याने या परिसंस्थेतील क्षमता वृद्धिंगत होत आहेत. जोशमध्ये आम्ही आमच्या प्रेक्षकांना समजून घेतो आणि आमच्या वापरकर्त्यांसाठी सर्जनशील आणि त्यांना गुंतवून ठेवेल असा कंटेंट पुरवण्यासाठी प्रयत्नशील असतो. आम्ही नेहमीच आमच्या क्रिएटर्सना दर्जेदार अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतो. शॉर्ट फॉर्म व्हिडिओमधील क्षमतांना नवे स्वरूप देणे आणि कंटेंट क्रिएशन एका नव्या पातळीवर नेणे या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे जोश ऑल स्टार्स.”
सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू झालेल्या जोश ऑल स्टार्समध्ये आजवर ५००० हून अधिक क्रिएटर्स सहभागी झाले आहेत आणि त्यांना कंटेंटची संकल्पनात्मक मांडणी, निर्मिती, कंटेंट डिस्कव्हरी, आर्थिक उत्पन्न आणि ऑनलाइन जगतातील नियम अशा विषयांवरील प्रशिक्षण सत्रांचा लाभ झाला आहे.