झी मराठीवरील गाजलेली मालिका तुझ्यात जीव रंगला मध्ये राणादा आणि पाठकबाईंची जोडी एकदम हिट झाली होती. त्यांच्या प्रेमकहाणीला भरभरून प्रेमसुद्धा मिळालं होतं. आता हे रीळ लाईफ कपल रियल लाईफमध्ये सुद्धा एकमेकांशी लग्न करणार आहेत.
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर या दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा साखरपुडा पार पडला. आणि त्यानंतर आता लग्नाची तारीख देखील जवळ येते की काय याची आतुरता वाढली आहे. रानदा म्हणून हार्दिक जोशी प्रसिद्ध झाला होता आणि अक्षया देवधर ही पाठक बाई प्रसिद्ध झाली होती. खऱ्या आयुष्यात या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला साखरपुडा पार पडल्यानंतर त्यांची चाहत्या वर्गामध्ये आनंदाची अशी लाट आली.
आता अगदी काही दिवसांमध्येच ते लग्न करणार आहेत. कारण त्यांचे केळवणाचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.. चाहात्यांना वेध लागले आहेत ते म्हणजे राणादा आणि पाठक बाई च्या लग्नाचे या दोघांच्या लग्नाची तारीख काय असेल वेळ काय असेल. हार्दिक आणि अक्षया इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय आहेत. दोघेही साखरपुड्यापासून नेहमीच एकमेकांशी निगडित अपडेट शेअर करत आले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या लाडक्या राणादा आणि अंजलीबाईंना एकत्र बघायला चाहते उत्सुक झाले आहेत.