मुंबई ११ ऑगस्ट, २०२२ – ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (BSE – 541302 NSE – DHRUV) ही भारतातील आघाडीची पायाभूत सुविधा सल्लागार कंपनी असून कंपनीने तिचे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठीचे अलेखापरिक्षीत आर्थिक परिणाम जाहीर केले आहेत.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील एकूण उत्पन्न १७.७६ कोटी रुपये होते.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी ईबिटा (EBITDA) १.४६ कोटी रुपये होता.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी करपश्चात नफा (PAT) ०.४६ कोटी होता
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी प्रती शेअर कमाई (EPS) ०.२३ रुपये होती.
ऑर्डर बुक ४२३ कोटी रुपयांच्या आर्डर बुक आहेत आणि अंमलात आले नसलेल्या २१५ कोटी रुपयांच्या ऑर्डर बुक आहेत.
याप्रसंगी बोलताना ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती तन्वी औती म्हणाल्या की, “आमची ३१ टक्के शीर्ष वाढ स्पष्टपणे दर्शवते की आम्ही विकासाच्या मार्गावर आहोत. विविध योजना राबविताना काही अडथळे आहेत परंतु ते कायमस्वरूपी नाहीत.
या तिमाहीत आम्हाला ३५.३४ कोटी रुपयांच्या तीन वर्क ऑर्डरसाठी परवानगी पत्र (LOA) मिळाले आहेत. या २ वर्क ऑर्डर्स ११.२० कोटी रुपये आणि १८.२९ कोटी रुपये आहेत. मिळालेल्या या ऑर्डर्स कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्वरूपाच्या आहेत. मोठ्या आकाराच्या ऑर्डर प्राप्त झाल्यामुळे कंपनीची तांत्रिक क्षमता सुधारते. कंपनीच्या सध्याच्या ऑर्डर बुक ४२३ कोटी रुपयांच्या आहे, जी व्यवसायासाठी दीर्घकालीन कमाईची दृश्यता प्रदान करते.
सरकार देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे आणि आमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी ही प्रमुख प्रेरणा आहे. आमचा व्यवसायातील अनुभव आणि कौशल्य तसेच ग्राहकांसोबतचे आमचे दीर्घकालीन संबंध आम्हाला आर्थिक वर्ष २३ आणि त्यानंतरच्या काळात जोरदारपणे पुढे जाण्यास सक्षम करतील.”