तुझ्या गळ्या माझ्या गळ्या, गुंफू भ्रष्ट नेत्यांच्या माळा ||
राठोड आणि सत्तारांसाठी माविआच्या या कथित भ्रष्ट मंत्र्यांविरोधी आवाज उठवणारे किरीट सोमय्यांची आता मन की बात
मुंबई : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कुणाला संधी मिळाली आहे हे स्पष्ट झालं आहे. शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्री या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेणार आहेत. भाजपाकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांसह नऊजणांना संधी मिळाली आहे.
शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास 41 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहुर्त मिळाला. हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज, मंगळवारी 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये झाला. यावेळी एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे 9 तर भाजपकडून 9 जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
शपथविधी सोहळा…
- मंत्रिमंडळ विस्तारात एकाही अपक्ष आमदाराला संधी नाही.
- भाजपकडून मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राजस्थानी मारवाडी समाजाचा चेहरा, मुंबईत शिवसेनेला रोखण्यात होईल फायदा.
- शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. महाराष्ट्र बॅंकेचे संचालक ते मंत्री:शिंदे सेनेचे धडाकेबाज आमदार शंभूराज देसाईंचा राजकीय प्रवास.
- भाजपच्या अतुल मोरेश्वर सावे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. कारसेवक प्रकरणावरून थेट ठाकरेंना भिडल्याचे बक्षीस, मनपा निवडणुकीत मिळणार फायदा.
- शिंदे गटाची बाजू ठामपणे मांडणारे दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नारायण राणेंच्या गडाला सुरूंग लावणारे कणखर नेते.
- टीईटी घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंची सोडली होती साथ, TET प्रकरणात नाव येऊनही मंत्रिपदी वर्णी.
- भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.गुवाहाटी मोहिमेत सक्रिय भूमिका निभावली, डोंबिवलीमध्ये मजबूत पकड.
- शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ…राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत केला होता प्रवेश; शिंदे गटात सामिल होताच मिळाले मंत्रिपद.
- शिंदे गटाकडून उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या उदय सामंतांचा झंझावती प्रवास.
- शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. ग्रामपंचायत सदस्य ते कॅबिनेट मंत्री:सामान्य कार्यकर्त्याला उभारी देणारा संदीपान भुमरेंचा थक्क करणारा प्रवास.
- भाजपकडून सुरेश खाडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. चार वेळा सांगलीतून आमदार.
- शिंदे गटाकडून संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राठोड यांना मंत्रीपदाची लॉटरी:पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी गेले होते मंत्रिपद.
- शिंदे गटाकडून दादा भुसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ…साधा शिवसैनिक ते मंत्री.
- शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. पानटपरी चालक ते मंत्री : वाचा गुलाबराव पाटील यांचा राजकीय प्रवास.
- भाजपकडून गिरीश महाजनांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
- भाजपच्या डॉ. विजयकुमार गावित यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ…दोनदा राज्यमंत्री आणि दोनदा कॅबिनेट मंत्री राहिलेल्या गावितांना पुन्हा संधी.
- भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
- भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 6 वेळा आमदार ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष.
- भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी विखे-पाटील यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवले आहे