सुगुणा फूड्स प्रा. लि. या भारतातील सर्वात मोठ्या पोल्ट्री कंपनीने भारतात पहिल्यांदाच कमी-कोलेस्ट्रॉल आहाराचा शोध घेणा-या आरोग्याबाबत जागरूक व्यक्तींसाठी डेल्फ्रेज हार्ट अंडी सादर केली आहेत. या अंड्यामध्ये दीर्घायुष्य व आरोग्यदायी हृदयासाठी संपन्न ओमेगा ३ व जीवनसत्व ई पोषक घटक आहेत.
डेल्फ्रेज हार्ट हे उच्च दर्जाचे फार्म फ्रेश अंडे आहे, ज्यामध्ये जवळपास २४ टक्के कमी कोलेस्ट्रॉल आहे. या अंड्यामध्ये फॅटी अॅसिड्स संपन्न प्रमाणात आहे, जे हृदयासाठी लाभदायी पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटचे प्रकार आहेत. ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स देखील आर्टिरिअल ब्लॉकेजचा (धमन्यामधील अडथळा) धोका कमी करण्यामध्ये मदत करतात.
डेल्फ्रेज तीन प्रकारची प्रिमिअम दर्जाची मूल्यवर्धित अंडी देखील देते आणि प्रत्येक अंड्यामध्ये सेलेनियम, व्हिटॅमिन्स व मिनरल्स सारखे विशेष पौष्टिक घटक आहेत, जे ग्राहकांना पौष्टिक मूल्यासोबत विशिष्ट कार्यक्षम लाभ देखील देतात. खाली इतर मूल्यवर्धित अंड्यांचे व्हेरिएण्ट्स देण्यात आले आहेत:
डीएचएसह संपन्न डेल्फ्रेज अॅक्टिव्ह
कॅरोटेनॉइड्ससह संपन्न डेल्फ्रेज शार्प
जीवनसत्व ड सह संपन्न डेल्फ्रेज एनर्जी
सुगुणा फूड्सच्या प्रोसेस फूड डिव्हिजनचे उपाध्यक्ष श्री. कृष्णा प्रसाद म्हणाले, ”आम्हाला ग्राहकांसाठी डेल्फ्रेज हार्ट सादर करण्याचा आनंद होत आहे. प्रौढ व्यक्ती व श्रमजीवी व्यावसायिकांच्या मॅक्रो व मायक्रो व्हॅस्कुलर कार्यांमध्ये सुधारणा करण्याचा मुख्य मनसुबा होता. बदलत्या जीवनशैलीसह आपल्याला आपण सेवन करत असलेल्या आहारावर देखरेख ठेवावी लागत आहे. आमचा विश्वास आहे की, अंड्यांमधील हा व्हेरिएण्ट सतत कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत गुणकारी ठरेल.”
सुगुणाच्या जैव-सुरक्षा-प्रमाणित फार्मवर सर्वात आरोग्यदायी कोंबड्यांच्या माध्यमातून डेल्फ्रेज अंडी तयार केली जातात आणि ती तुमच्या जवळच्या रिटेल आउटलेटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तसेच ही अंडी झोमॅटो व स्वीगीवर देखील उपलब्ध आहेत.