प्रख्यात यशस्वी दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या द्वारा दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट – ‘उंचाई’च्या पहिल्या टीझर पोस्टरचा फर्स्ट लुक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने रिलीज करीत राजश्रीने फ्रेंडशिप डे अनोख्या पद्धतीने साजरा केला. राजश्रीचा हा चित्रपट ११.११.२२ रोजी संपूर्ण देशभरात भव्यतेने रिलीज केला जाणार आहे. यापूर्वी कधीही एकत्र न आलेले बॉलिवूडमधील नामवंत कलाकार ‘उंचाई’मधून प्रथमच एकत्र येत आहेत. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता आणि सारिका, परिणिती चोप्रा यांच्यासोबत डॅनी डेन्ग्झोंपा आणि नफिसा अली सोढी हे आणखी दोन मोठे कलाकार पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘उंचाई’च्या फर्स्ट लूकमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी हिमालयात ट्रेकिंग करताना दिसत असून पार्श्वभूमीवर माउंट एव्हरेस्ट दिसत आहे. ‘मैत्री ही त्यांची एकमेव प्रेरणा आहे’ अशी टॅगलाईन टीझर पोस्टरच्या केंद्रस्थानी आहे. यावरून मैत्री हा या चित्रपटाचा विषय असल्याचे संकेत देतो.
‘उंचाई’ हा राजश्रीचा ६० वा चित्रपट आहे. तर सूरज आर. बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेला हा सातवा चित्रपट आहे. राजश्री यंदा आपला ७५ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. राजश्रीच्या या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कमलकुमार बडजात्या, स्वर्गीय राजकुमार बडजात्या आणि राजश्रीचे अजितकुमार बडजात्या यांनी महावीर जैन फिल्म्सचे महावीर जैन आणि बाउंडलेस मीडियाच्या नताशा मालपाणी ओसवाल यांच्यासोबत सहभागिता केलेली आहे.
राजश्रीने नेहमीच भव्य आणि मोठ्या प्रमाणावरील उत्कृष्ट व्हिज्युअल असलेले चित्रपट तयार केलेले आहेत. ‘उंचाई’च्या टीझर पोस्टरवरील हिमालयाचे चित्तथरारक व्हिज्युअल वेधक आणि रोमांचक आहेत. सूरज आर. बडजात्या त्यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच एक भव्य उत्कृष्ट मनोरंजन करणारा चित्रपट प्रेक्षकांपुढे घेऊन येत आहेत. ‘उंचाई’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असून ११.११.२२ रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.