स्टाइल, स्मार्ट, स्मार्ट प्रो, शार्प प्रो व सेवी प्रो या ५ व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध
मुंबई, १७ जानेवारी २०२३: एमजी मोटर इंडियाने आज हेक्टरच्या किंमतीची घोषणा केली असून नेक्स्ट-जनरेशन हेक्टर १४.७२ लाखांपासून उपलब्ध होणार आहे. स्टाइल, स्मार्ट, स्मार्ट प्रो, शार्प प्रो व सेवी प्रो या ५ व्हेरिएण्ट्समध्ये हेक्टर येईल. नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अनेक उत्साहवर्धक तंत्रज्ञाने आणि ११ ऑटोनॉमस लेव्हल २ (एडीएएस) वैशिष्ट्ये आहेत, जी ड्रायव्हिंग आरामदायीपणासह सुधारित सुरक्षितता देतात. नवीन आकर्षक एक्स्टीरिअर व सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये, तसेच आकर्षक डिझाइन घटकांसह नेक्स्ट-जनरेशन ड्राइव्ह व युजर अनुभव देते.
नवीन एसयूव्हीचे लक्षवेधक इंटीरिअर्स ड्युअल-ओन अर्जाइल ब्राऊन व ब्लॅक थीमसह वूडन फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. प्रमुख एसयूव्ही ५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशन्समध्ये उपलब्ध आहे. एसयूव्हीमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय व एैसपैस जागा आहे. ६-आसनी एसयूव्ही सीट्स कॅप्टन कन्फिग्युरेशनमध्ये येतात, तर ७-आसनी वेईकलमध्ये बेंच सीट्स आहेत.
ऑटोनॉमस लेव्हल २ एसयूव्हीमध्ये ११ अॅडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स (एडीएएस) वैशिष्ट्यांसह ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) व ऑटो टर्न इंडिकेटर्स आहेत, ज्यामधून परिपूर्ण मन:शांती, सुरक्षितता व आरामदायीपणाची खात्री मिळते. इंटेलिजण्ट ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) वेईकलला लेनच्या मध्यभागी आणि पुढील बाजूस असलेल्या वेईकलपासून सुरक्षित अंतर ठेवत वाहतूक कोंडीच्या स्थितीत किमान प्रयत्न व अधिक सुरक्षिततेची खात्री देते.
नेक्स्ट जनरेशन एमजी हेक्टरमध्ये नवीन सादर करण्यात आलेले स्मार्ट ऑटो टर्न इंडिकेटर्स देखील विनासायास व सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देतात. स्टीअरिंग अँगलवर आधारित संबंधित इंडीकेटर लाइट आपोआपपणे ऑन/ऑफ होते. हे ऑटोमॅटिक सिग्नल पार्किंगमधून रस्त्यावर येताना किंवा यू-टर्न घेताना ड्रायव्हर इंडीकेटर देण्यास विसरला तर उपयुक्त ठरेल.