MUMBAI/NHI
श्री उद्यानगणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यासाठी एकूण ४६ शालेय कबड्डी संघात ८ व ९ जानेवारी रोजी दिवसभर शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये चुरशीचे सामने होणार आहेत. सनराईज हायस्कूल-वरळी विरुध्द विनोबा भावे नगर शाळा-कुर्ला यामध्ये उद्घाटनीय लढतीने श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित कबड्डी स्पर्धेला सकाळी ८.०० वा. प्रारंभ होईल. समितीचे अध्यक्ष गुरुनाथ पांगम, विश्वस्त प्रकाश परब आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
श्री उद्यानगणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धेमधील मुलांच्या गटात २८ संघ सहभागी झाले असून मारवाडी विद्यालय-गिरगाव, कुलाबा सेकंडरी स्कूल, उत्कर्ष मंदिर-मालाड, जनता शिक्षण संस्था-वरळी, चुनाभट्टी मुंबई पब्लिक स्कूल, शारदाश्रम विद्यामंदिर-दादर, साने गुरुजी स्कूल-दादर, सरस्वती विद्यामंदिर-घाटकोपर, डॉ. अॅन्टोनिओ डासिल्व्हा हायस्कूल-दादर, ताराबाई मोडक स्कूल-दादर, समता विद्यामंदिर-साकीनाका, आंध्र एज्युकेशन सोसायटी-वडाळा आदी शालेय संघात चुरस राहील. शालेय मुलींच्या गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय-विक्रोळी, शारदाश्रम विद्यामंदिर-दादर, विकास हायस्कूल-विक्रोळी, श्री गुरुदत्त मित्तल विद्यालय-सायन, बालमोहन विद्यामंदिर-दादर, ताराबाई मोडक स्कूल-दादर, उत्कर्ष मंदिर-मालाड आदी १८ संघ विजेतेपद मिळविण्यासाठी जोरदार लढती देतील. प्रत्येक गटातील अंतिम विजेत्यास रोख रु.५,०००/-, अंतिम उपविजेत्यास रोख रु.३,०००/- व तृतीय क्रमांकास रोख रु.२,०००/- पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक पुरस्कार देखील आहेत.