मुंबई : बेस्ट स्टाफ क्वार्टर्स अॅलोटीज असोसिएशन-वडाळा आणि प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर यांच्यातर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने झालेल्या ‘बेस्ट नवोदित वडाळा श्री’ किताबाचा मानकरी ऋतिक माइन ठरला. ऋतिकने समीर अमासरेचे कडवे आव्हान संपुष्टात आणून बाजी मारली. स्पर्धेतील नवोदित शरीरसौष्ठवपटूच्या शरीरसंपदेला व्यायाम शौकीनांनी वडाळा येथील बेस्ट स्टाफ क्वार्टर्स पटांगणात उत्स्फूर्त दाद दिली.
तीन गटात रंगलेल्या ‘बेस्ट नवोदित वडाळा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेमधील पहिल्या गटात अविनाश गोरीवलेने प्रथम क्रमांक, आकाश गाओगेने द्वितीय क्रमांक, आकाश चौहानने तृतीय क्रमांक; दुसऱ्या गटात ऋतिक माइनने प्रथम क्रमांक, सुरज बांदलने द्वितीय क्रमांक, किशन गुप्ताने तृतीय क्रमांक तर तिसऱ्या गटात समीर उमासरेने प्रथम क्रमांक, नितीश कासेकरने द्वितीय क्रमांक व नीरज तीवतकरने तृतीय क्रमांक पटकाविला.