नवी दिल्ली : कापणीच्या सणांना भारतात खूप महत्त्व आहे. या सणाचा उत्साह अधिक वाढवत स्नॅपचॅटने लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू, पेड्डा पांडुगा, पौष परबोन व पोंगलचा उत्साह मजेदार व संवादात्मक पद्धतीने साजरा करण्यासाठी एआर गेमिंग लेन्स आणि नवीन एआर लेन्स लॉन्च केले आहेत. या नवीन प्रादेशिक लेन्सेस या सणाच्या कालावधीच्या, वसंत ऋतूच्या प्रारंभाच्या आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करण्यासाठी आणि वर्षभराच्या समृद्ध कापणीकरिता आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुसज्ज आहेत.
स्नॅप लेन्स क्रिएटर तनिष्काने निर्माण केलेल्या नवीन एआर काइट गेमच्या लॉन्चसह स्नॅपचॅटर्स पतंगांच्या उत्सवामध्ये उत्साहवर्धक एआर स्पिनची भर करू शकतात. ही धमाल गेमिंग लेन्स स्नॅपचॅटर्सना त्यांचा स्वत:चा पतंग निर्माण करण्याची सुविधा देईल, ज्याद्वारे त्यांना मांज्याची फिरकी गोळा करता येईल आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडथळयांना सिझर्सच्या रूपात दूर करता येईल. सेलिब्रेशन्समध्ये अधिक वैयक्तिक उत्साहाची भर करण्यासाठी स्नॅपचॅटर्स सेलिब्रेटरी मकर संक्रांती-थीम लेन्सचा देखील वापर करू शकतात, ज्यामध्ये सर्वांचे आवडते तीळाचे लाडू आणि निळ्या आकाशामध्ये उडणाऱ्या रंगबेरंगी पतंगांचा समावेश आहे.
स्नॅप इन्क.ने भारतीय स्नॅपचॅटर समुदायासाठी अॅप अनुभवाचे स्थानिकीकरण करण्यावर सतत लक्ष केंद्रित केले आहे. स्नॅपचॅट स्नॅप लेन्स क्रिएटर इशप्रीत सिंगने निर्माण केलेल्या वैविध्यपूर्ण एआर लेन्सेससह लोहरीचा उत्साह, पश्चिम बंगालच्या पौष पारबोनच्या गोडव्याचे स्वागत करण्यास, तसेच लोहरीसाठी शेकोटी आणि पौष पारबोनसाठी रसगुल्लाचा मोठा बाऊल यांसारख्या प्रमुख प्रादेशिक घटकांना कॅप्चर करण्यास सज्ज आहे. तसेच तामिळनाडूमध्ये साजरा केला जाणारा सण पोंगलसाठी स्नॅपचॅटर्स आकर्षक मोटिफ्स असलेल्या प्रखर लेन्सच्या माध्यमातून त्यांच्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवू शकतात. या लेन्समध्ये स्वादिष्ट मुख्य पायसमच्या भांड्याचा समावेश आहे.
स्नॅपचॅटने यावर्षी नवीन आणि विशेष सेलिब्रेटरी लेन्स सादर करून त्याच्या लेन्सचे स्थानिकीकरण पुढील स्तरावर नेले आहे, ज्यामुळे स्नॅपचॅटर्सना त्यांच्या आवडत्या कापणी उत्सवातून प्रादेशिक उत्सवी घटकांचा आनंद घेता येईल. आसामच्या माघ बिहू उत्सवाच्या लेन्सपासून ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या पेड्डा पांडुगापर्यंत स्नॅपचॅट उत्सवांना नवीन उंचीवर नेत आहे.