मुंबई, 30 ऑगस्ट २०२४: दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरमुळे निर्माण होणारी अनिश्चितता आणि भीती यांनी ग्रासलेल्या रुग्णांसाठी योग्य निदान आणि देखभाल मिळवणे एक मोठे आव्हान असते. अपोलो हॉस्पिटल्स रेअरकेयर क्लिनिकमध्ये आम्ही त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सज्ज आहोत. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील हे विशेष क्लिनिक तयार करण्यात आले आहे. दुर्मिळ आणि आव्हानात्मक कॅन्सरचे निदान बऱ्याचदा चुकीचे केले जाते, परिणामी उपचार देखील चुकीचे केले जातात, रुग्णांना उपचारांमधून अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, अशा रुग्णांना सर्वसमावेशक देखभाल पुरवण्याचे काम क्लिनिक मध्ये केले जाते.
लाखामध्ये अवघ्या ६ केसेस कॅन्सरच्या असतात, त्यांना दुर्मिळ मानले जाते, एकूण कॅन्सर केसेसमध्ये यांचे प्रमाण २०% इतके लक्षणीय आहे. यांचे २०० पेक्षा जास्त प्रकार ओळखण्यात आले आहेत. दुर्मिळ कॅन्सर झालेले रुग्ण एकटे पडतात, त्यांच्या निदान प्रक्रिया आणि उपचार नियमांबाबत फारशी माहिती उपलब्ध नसल्याने त्यांच्या मनात अनिश्चितता असते. हाडांचे व सॉफ्ट टिश्यू सार्कोमा (देसमोईड ट्युमर), त्वचेचा कॅन्सर, गरोदरपणात होणारे कॅन्सर, लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्यांकांना होणारे कॅन्सर (एलजीबीटीक्यू+ कॅन्सर), न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर (एनईटी), आनुवंशिक कॅन्सर आणि कुटुंबामध्ये, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये जीन्समार्फत होणारे कॅन्सर, किशोरवयीन मुले किंवा तरुणांना होणारे कॅन्सर दुर्मिळ कॅन्सर प्रकारात मोडतात. सहव्याधींसह वृद्धापकाळात कॅन्सर होणे, रोगप्रतिकारशक्ती कमजोर पडणे, सहव्याधी असलेले आणि पॉली पिल थेरपीजचे रुग्ण, असामान्य लक्षणे किंवा स्तन, गायनॅकॉलॉजिकल, फुफ्फुसे, गॅस्ट्रोइंटेस्टीनल, डोके आणि मानेच्या सामान्य कॅन्सरमध्ये दुर्मिळ हिस्टोलॉजीज दिसणे या ऑन्कोलॉजीसाठी आव्हानात्मक बाबी आहेत.
डॉ ज्योती बाजपेयी, मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी लीड, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरमध्ये लवकरात लवकर निदान होणे आवश्यक असते, अशा आजारांमध्ये लक्षणांच्या बाबतीत गैरसमज होण्याची शक्यता खूप जास्त असते. सोसायटी ऑफ इम्युनोथेरपी इन कॅन्सर्स (एसआयटीसी) सारख्या ग्लोबल कॅन्सर असोसिएशन्समध्ये सक्रिय सदस्य, युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये इम्युनो-ऑन्कोलॉजीचा फॅकल्टी आणि सार्कोमासाठी पास्ट फॅकल्टी, विमेन फॉर ऑन्कोलॉजीसाठी कोर कमिटी सदस्य म्हणून काम करताना मला दुर्मिळ कॅन्सर प्रकारांचे अचूक निदान व त्यावर उपचार करण्याची नैपुण्ये आत्मसात करता आली, त्यामुळे योग्य उपचार तातडीने करण्यात मदत मिळते, रुग्णांना चांगले परिणाम मिळतात. प्रत्येक रुग्णाच्या व्यक्तिगत उपचार योजना विकसित करण्याचे काम आमची क्लिनिशियन्सची टीम करते.”
दुर्मिळ कॅन्सरची लक्षणे चटकन लक्षात न येणारी असू शकतात. सतत येणारा, बरा न होणारा खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, तिळांमध्ये बदल होणे किंवा त्वचेमध्ये विकृती निर्माण होणे, कारण समजून ने येणारी वेदना, फिट येणे किंवा डोके दुखणे, लिम्फ नोड्सना सूज येणे, वारंवार ताप येणे, कायम थकवा येणे, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे अशी लक्षणे दुर्मिळ कॅन्सरमध्ये दिसून येतात.
डॉ.अनिल डिक्रूझ, डायरेक्टर-सीनियर कन्सल्टंट हेड अँड नेक ऑन्कोलॉजी, अपोलो हॉस्पिटल म्हणाले, “संपूर्ण जगभरात कॅन्सरचे प्रमाण २०१२ मध्ये १२ दशलक्ष ते २०१८ मध्ये १८ दशलक्ष आणि २०२० मध्ये १९.३ दशलक्ष इतके वेगाने वाढत आहे. भारतातील कॅन्सर रजिस्ट्रीमध्ये देखील असाच ट्रेंड दिसत आहे. अपोलो कॅन्सर सेंटर्स पुराव्यांवर आधारित, ऑर्गन साईट स्पेशालिटी सेवा, सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्लिनिशियन्स असलेले ट्युमर बोर्ड्स सुरु करून कॅन्सर रुग्णांच्या देखभालीमध्ये सुधारणा घडवून आणत आहेत. सर्वात दुर्मिळ आणि आव्हानात्मक कॅन्सर केसेसना देखील व्यक्तिगत व मल्टीडिसिप्लिनरी देखभाल दिली जावी यासाठी आमची बांधिलकी रेअरकेयर क्लिनिक दर्शवते. रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या कॅन्सरसाठीच्या देखभालीच्या अनुभवात परिवर्तन घडवून आणणे आमचे उद्दिष्ट आहे.”