बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांच्या सोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिल्यानंतर एकच चर्चा सुरू आहे. या नात्यामुळे अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्यांना ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या सुष्मिता सेनला (Sushmita Sen Video) ट्रोलिंग नवीन नाही. ती या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या चाहत्यांसाठी व्हिडीओ आणि फोटो नेहमीच शेअर करते. अशातच सुष्मिता सेनने स्विमिंग करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल (Sushmita Sen Viral Video) होत आहे.Also Read – Viral Video : अरेरे…! शिक्षिकेने विद्यार्थ्याकडून करुन घेतली बॉडी मसाज, व्हिडिओ पाहून तुमचाही राग होईल अनावर
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. सुष्मिता अनेकदा तिच्या दोन्ही मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचा खास फोटो शेअर करत रिलेशनमध्ये असल्याची माहिती सर्वांना दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत असल्याचे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच सुष्मिता सेनाचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.