Left to Right – Mr. Hitesh Das – Fund Manager, Mr. Shreyash Devalkar – Head of Equity, and Mr. Ashish Gupta, CIO, Axis Mutual Fund at the press conference launch of Axis Consumption Fund.
(ग्राहक उपभोगविषयक संकल्पनेतील ओपन-एंडेड इक्विटी योजना)
मुंबई | २२ ऑगस्ट २०२४ : नागरिकांचे वाढते उत्पन्न, शहरीकरण आणि वाढता मध्यमवर्ग यामुळे भारताच्या आर्थिक परिदृश्यात जलद गतीने परिवर्तन होत आहे. भारताच्या वाढत्या उपभोग क्षेत्राच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी आणि देशातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्याची एक धोरणात्मक संधी गुंतवणूकदारांना देण्यासाठी, भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्यांपैकी एक असलेल्या ॲक्सिस म्युच्युअल फंडाने ॲक्सिस कंझम्पशन फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे.
निफ्टी इंडिया कंझम्पशन टीआरआय हा बेंचमार्क असलेल्या या नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२४ या काळात खुली असणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन हितेश दास, श्रेयश देवलकर आणि कृष्णा नारायण (ओव्हरसीज सिक्युरिटीजसाठी) हे करणार आहेत. या थिमॅटिक गुंतवणुकीच्या संधीचा फायदा घेण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.
भारताची उपभोग-क्षमता आत्मसात
भारतात वस्तू व सेवा यांना मोठीच मागणी असल्याने येथे आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होते. क्रयशक्तीची क्षमता असलेली विशिष्ट लोकसंख्या, त्यांची वाढती क्रयशक्ती आणि शहरीकरण या घटकांमुळे त्यास पाठबळ मिळते. तरुण आणि महत्त्वाकांक्षी अशी मोठी लोकसंख्या भारतात आहे. साहजिकच येत्या काही वर्षांत भारतातील ग्राहकांच्या खर्चात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे गृहीत धरून ॲक्सिस कंझम्पशन फंडाने एफएमसीजी, वाहन उद्योग, दूरसंचार, आरोग्यसेवा, बांधकाम आणि इतर काही उपभोग-चालित क्षेत्रांचा समावेश आपल्या पोर्टफोलिओमध्ये केला आहे.
“भारतात विकसीत होणारी उपभोगाची पद्धती हा भारताच्या विकासाच्या मार्गाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. आपल्या लोकसंख्येच्या आकांक्षा ज्या प्रमाणात वाढत आहेत आणि तिची खर्च करण्याची शक्ती वाढत आहे, त्या प्रमाणात कंपन्याही शाश्वत पद्धतीने वाढण्यासाठी सज्ज होत आहेत,” असे निरीक्षण ‘ॲक्सिस एएमसीचे’ मुख्य गुंतवणूक अधिकारी आशिष गुप्ता यांनी मांडले. ते पुढे म्हणाले, “या वाढीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी ॲक्सिस कंझम्पशन फंड गुंतवणूकदारांना देतो आणि त्या अनुषंगाने या गतिमान वाढीचा लाभ घेणारा एक मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. हा फंड केवळ सध्याच्या उपभोगाचा कल प्रतिबिंबित करत नाही, तर भविष्यातील वाढीच्या घटकांचाही अंदाज बांधतो. गुंतवणूकदारांना भारतातील आर्थिक परिवर्तनाचे फायदे मिळवून देण्यासाठी हा फंड काम करतो. हा थिमॅटिक दृष्टिकोन आपल्या देशाच्या प्रगतीच्या मूलभूत घटकांशी निगडीत आहे. गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी यातून एक अद्वितीय मार्ग मिळतो.”
ॲक्सिस कंझम्पशन फंडाविषयीः
भारतातील गतिमान स्वरुपाच्या उपभोग क्षेत्राचे भांडवल करण्यासाठी खास बनविण्यात आलेला ‘ॲक्सिस कंझम्पशन फंड’ हा गुंतवणूकदारांना अशा उद्योगांमध्ये संधी देतो, जे उद्योग भारतातील ग्राहकांच्या वर्तनात चालू असलेल्या संरचनात्मक व सांस्कृतिक बदलांचा लाभ घेऊ शकतात. गुंतवणुकीच्या गुणवत्ता-केंद्रित शैलीने हा फंड बॉटम-अप दृष्टिकोनाचा अवलंब करेल आणि ग्राहकांकडून उपभोग वाढत असल्याच्या कलांचा वापर करून घेईल.
केवळ एफएमसीजी क्षेत्रावर अवलंबून न राहता त्या पलिकडील क्षेत्रांवर, उदा. ग्राहक विवेकाधीन, रिटेल विक्री, वाहन, बांधकाम या क्षेत्रांवर, या फंडाचा भर असेल. भारतातील मोठी उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेच्या वाढीची क्षमता उपयोगात आणण्याच्या दृष्टीने ‘ॲक्सिस कंझम्पशन फंड’ एक वैविध्यपूर्ण गुंतवणूक दृष्टीकोन ऑफर करेल. भारतातील वाढत्या मध्यमवर्गाच्या आणि वाढत्या ग्राहक खर्चाच्या वाढीच्या कथेत सहभागी होऊन गुंतवणूकदार या फंडाच्या तज्ज्ञ व्यवस्थापनाचा आणि क्षेत्र-विशिष्ट अंतर्दृष्टींचा फायदा घेऊ शकतात.
धोरणात्मक मुद्दे –
- नावीन्यता: नावीन्यता ही आता केवळ टेक उद्योगापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर उपभोग क्षेत्रामध्ये (उदा. स्पोर्ट्स एनर्जी ड्रिंक्स, कोल्ड प्रेस्ड ऑइल इ.) खूप नावीन्यपूर्ण गोष्टी घडत आहेत.
- औपचारिकीकरण: तयार कपडे, टाईल्स, सॅनिटरी वेअर, कापड, पादत्राणे, दागिने इत्यादी संघटित बाजारपेठांकडे वळल्याने उपभोग क्षेत्राचा बाजारपेठेतील वाटा वाढला.
- शहरीकरण: शहरीकरण वाढल्याने वळल्याने लोकांची जीवनशैली आणि कार्यशैली बदलत आहे. त्यामुळे रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांवर परिणाम झाला आहे आणि ग्राहक विवेकाधिकाराच्या उद्योगांच्या वाट्यामध्ये वाढ झाली आहे.
- प्रवेश: ऑनलाइन फॅशन, किराणा, द्रुत व्यापार यांसारख्या श्रेणींमध्ये ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून प्रवेश केल्याने उपभोग क्षेत्राला प्रचंड वाव आहे.
- प्रीमियम मूल्यवर्धन: पॅकेज्ड, ब्रँडेड किंवा जास्त किंमतीच्या वस्तू ग्राहक जास्त प्रमाणात घेऊ लागले आहेत, तसेच दैनंदिन आयुष्यात अशा वस्तू वा सेवा घेण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत; उदा. वाहन, एफएमसीजी, सौंदर्य उत्पादने आणि पर्सनल केअर.
“भारत आपल्या आर्थिक प्रवासात एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. आपण सध्या जागतिक अनिश्चिततेतून मार्गक्रमण करत असताना, आपल्या देशांतर्गत बाजारपेठेचे सामर्थ्य आणि वाढ यांची क्षमता कधीच स्पष्ट झाली नाही,” असे स्पष्टीकरण ‘ॲक्सिस एएमसीचे’ व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार यांनी दिले. ते पुढे म्हणाले, “ग्राहक परिदृश्याची उत्क्रांती या देशातील सर्वात आकर्षक अशा कथनाकडे पाहण्याचा ॲक्सिस कंझम्पशन फंड हा आमचा एक मार्ग आहे. भारतातील वाढती ग्राहकसंख्या, त्यांची बदलती प्राधान्ये आणि वाढती क्रयशक्ती यांमुळे निर्माण झालेले मूल्य मिळवणे हा आमच्या या फंडाचा उद्देश आहे. आमच्याकडे इक्विटी मार्केटमधील विस्तृत अनुभव असलेल्या फंड व्यवस्थापकांचे एक उत्तम पथक आहे. गुंतवणूकदारांसाठी भारतीय बाजारपेठेतील संधी प्रतिबिंबित करणारा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ हे व्यवस्थापक करतील.”
गुंतवणूक धोरणाविषयीच्या तपशीलवार माहितीसाठी आणि योजनेचे माहिती दस्तऐवज (एसआयडी) / मुख्य माहिती मेमोरँडम (केआयएम) पाहण्यासाठी, कृपया www.axismf.com ला भेट द्या..
स्रोत: ३१ जुलै २०२४ रोजीचे ॲक्सिस एमएफ संशोधन