प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 195/- ते रु. 206/- दरम्यान निश्चित
मुंबई, 16 ऑगस्ट, 2024: मुंबईयेथील आयटी सोल्यूशन्स पुरवठादार ओरिअंट टेक्नॉलॉजिज लिमिटेड ही कंपनी येत्या बुधवार दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री सुरु करीत आहे. त्यासाठी कंपनीने रु. 10/- फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी प्राईस बँड रु. 195/- ते रु.206/- या दरम्यान निश्चित केला आहे. ओरिअंट टेक्नॉलॉजिज लिमिटेडची आयपीओ विक्री बुधवार दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी खुली होईल व शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी बंद होईल. गुंतवणुकदार किमान 72 समभागांच्या लॉटसाठी व त्यापुढे 72 च्या पटीत गुंतवणुकीसाठी बीड करु शकतील.
आयपीओमध्ये रु. 120 कोटी पर्यंत फ्रेश इश्यूचा समावेश आहे. तसेच प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर यांच्यावतीने ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत 4,600,000 समभाग ऑफरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या भांडवलापैकी रु. 10.35 कोटी रुपये नवी मुंबई येथे कार्यालयाची जागा घेण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच 79.65 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी व अन्य सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहेत.
ओरिअंट टेक्नॉलॉजिज कंपनीची स्थापना 1997 साली करण्यात आली होती. तेव्हापासून कंपनीने व्यवसायांसाठी आवश्यक विविध शाखांसाठी लागणारी आयटी उत्पादने विकसित करण्याचे कौशल्य हस्तगत केले आहे. कंपनीच्या अशा उत्पादनांमध्ये आयटी इंफ्रास्ट्रक्चर प्रॉडक्ट्स अँड सोल्यूशन्स, आयटी एनॅबल्ड सऱ्व्हीसेस (आयटीईएस) आणि क्लाउड अँड डेटा मॅनेजमेंट सेवा यांचा समावेश आहे.
कंपनीच्या व्यवसाय प्रचालनामध्ये प्रगत तंत्रज्ञान आधारित सोल्यूशन्सचा समावेश आहे. यासाठी कंपनीला डेल इंटरनॅशनजल सर्व्हीसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (डीइएलएल) आणि फॉर्टीनेट (फॉर्टीनेट), इंकॉर्पोरेटेड तसेच न्यूटॅनिक्स नेदरलँड्स बी.व्ही. (न्यूटॅनिक्स) यासारख्या तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारी करावी लागते. मुंबईतील ओरिअंट टेक्नॉलॉजिज कंपनीने कोल इंडिया, माझगाव डॉक, डीडेकर, ज्योती लॅब्स, एजीजी इंटीग्रीऑन, ब्ल्यूचिप, ट्रेडबुल्स, व्हीजेएस बँक, व्हीकेएस बँक, आणि जॉइंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स (जीएसटी महाविकास) मुंबई या बहुमूल्य ग्राहकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत.
ओरिअंट टेक्नॉलॉजिज कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये, 30 जून 2024 रोजीपर्यंतच्या माहितीनुसार रु. 101.20 कोटींच्या ऑर्डर आहेत.
ओरिअंट टेक्नॉलॉजिजने 2024 महसूल वर्षात रु. 602.89 कोटी रुपये महसूल मिळवला आहे. आधीच्या वर्षात कंपनीने रु. 535.10 कोटी रुपये महसूल मिळवला होता. महसूलातील ही वाढ प्रामुख्याने क्लाउड डेटा मॅनेजमेंट सेवा व आयटीईएस सेवांच्या महसूलवाढीमुळे झाली आहे. यामुळे कंपनीचा करोत्तर नफा (पीएटी) 2024 साली 8.22 टक्क्यांनी वाढून 41.45 कोटींवर पोहोचला. 2023 साली हा नफा 38.30 कोटी रुपये होता.
एलरा कॅपिटल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजरचे काम पाहात आहे. तसेच लींक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रार म्हणून कर्तव्य बजावत आहे. कंपनीचे समभाग देशातील बीएसई व एनएसई या प्रमुख शेअरबाजारांमध्ये सूचिबध्द करण्यात येणार आहेत.
आयपीओ ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. ऑफरमध्ये क्यूआयबी अर्थात अर्हताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्क्यांपेक्षा कमी व किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत.
संदर्भ सूची:
आयपीओचा इश्यू आकार प्राईस बँडच्या उच्च व निम्न पातळीवर अवलंबून असेल.
फ्रेश ओएफएस (46,00,000 समभाग) एकूण
लोअर बँड (@रु. 195) रु. 120 कोटी रु. 89.70 कोटी रु. 209.70 कोटी
अपर बँड (@रु.206) रु. 120 कोटी रु. 94.76 कोटी रु. 214.76 कोटी