· नोव्हालीड फार्मा यांनी डायअल्कस विकसित केले असून रुग्णांवर केलेल्या चाचण्यांमध्ये त्याचे आश्वासक परिणाम दिसून आले आहेत. या चाचण्यांच्या पहिल्या १२ आठवड्यांत ६०.३० टक्के अल्सर बरा झाल्याचे तर २४ आठवड्यांच्या चाचण्यांत ७७.२० टक्के अल्सर बरा झाल्याचे दिसून आले
· डायअल्कस ची भारतात वितरण आणि विक्री करण्यास CDSCO (Central Drugs Standard Control Organization)या औषध विषयक नियंत्रक संस्थेने मंजुरी दिली आहे; या औषधाच्या संशोधनासाठी आलेल्या खर्चाचा काही भाग BIRAC (Biotechnology Industry Research Assistance Council) या भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या संस्थेने दिला आहे
मुंबई,16 ऑगस्ट 2024 : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन मंडळाच्या मधुमेह विभागाने (ICMR-INDIAB – Indian Council of Medical Research–India Diabetes) २०२३ मध्ये केलेल्या पाहणीनुसार भारतात मधुमेहाचे १० कोटी रुग्ण आहेत तर आणखी १३ कोटी ६० लाख व्यक्ती मधुमेह पूर्व अवस्थेत आहेत. हे भारतपुढील एक कठीण आव्हान आहे आणि २०३० या वर्षापर्यंत भारत जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाण्याची भीती आहे.
या गंभीर आव्हानाचा सामना करण्याचा एक भाग म्हणून डायअल्कस हे डायबेटिक फूट अल्सर (मधुमेहींच्या पायाला झालेल्या ब-या न होणा-या जखमा) या समस्येवरील उपचारासाठी प्रभावी औषध भारतीय बाजारपेठेत सादर केल्याचे इप्का लॅबोरेटरी अभिमानाने जाहीर करीत आहे. नोव्हालीड फार्मा प्रा. लि. यांनी डायअल्कस विकसित केले असून डायबेटिक फूट अल्सर वरील उपचारांच्या बाबतीत ते एक नवे पाऊल ठरणार आहे. या औषधाला CDSCO Central Drugs Standard Control Organization) या औषध विषयक नियंत्रक संस्थेने मंजुरी दिली आहे; या औषधाच्या संशोधनासाठी आलेल्या खर्चाचा काही भाग BIRAC (Biotechnology Industry Research Assistance Council) या भारत सरकारच्या संस्थेने दिला आहे.
डायअल्कस च्या विमोचन सोहळ्याला श्री प्रेमचंद गोधा, श्री ए के जैन आणि श्री सुप्रीत देशपांडे यांच्यासह अनेक नामवंत उपस्थित होते.
भारतात झालेल्या तिस-या टप्प्यातील चाचणीत डायअल्कस ची प्रभावी क्षमता निदर्शनास आली. या चाचण्यांच्या पहिल्या १२ आठवड्यांत ६०.३० टक्के अल्सर बरा झाल्याचे तर २४ आठवड्यांच्या चाचण्यांत ७७.२० टक्के अल्सर बरा झाल्याचे दिसून आले. हे निष्कर्ष डायबेटिक फूट अल्सर वरील औषधांच्या आजवरच्या सर्वात यशस्वी चाचण्यांमध्ये समाविष्ट करता येतील.
इप्का लॅबोरेटरीचे कार्यकारी अध्यक्ष श्री प्रेमचंद गोधा म्हणाले, “ मधुमेह झालेल्या व्यक्तींपैकी १० टक्क्यां पेक्षा जास्त व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी डायबेटिक फूट अल्सर चा त्रास होतो आणि हा आजार अनियंत्रित मधुमेहामुळे निर्माण होणा-या समस्यांपैकी एक आहे. या स्वामित्व हक्कांकित औषधाला मान्यता मिळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण डायबेटिक फूट अल्सर हे रुग्णाचा पाय कापून टाकण्याच्या ८० टक्के शस्त्रक्रिया या समस्येमुळे होतात.
नोव्हालीड फार्म प्रा. लि. यांच्या भागीदारीत स्वामित्व हक्क वापरण्याच्या आधारावर डायअल्कस भारतात सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. इलाज उपलब्ध नसलेल्या व्याधी आणि मधुमेहावरच्या उपचार यावर इप्का लॅबोरेटरी करत असलेल्या प्रयत्नांचे हे निदेशक आहे.”