मुंबई , : इको रिसायकलिंग लिमिटेड (बीएसई: इकोरेको) या भारतातील पहिल्या आणि अग्रगण्य व्यावसायिक ई-वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने 31 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल आज जाहीर केले.
आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीतील प्रमुख आर्थिक मुद्द्यांकडे एक दृष्टीक्षेप :
एकत्रित | स्टँडअलोन | |||||
तपशील (कोटी रु.) | आर्थिक वर्ष 25
पहिली तिमाही |
आर्थिक वर्ष 24
पहिली तिमाही |
वार्षिक वाढ | आर्थिक वर्ष25
पहिली तिमाही |
आर्थिक वर्ष24
पहिली तिमाही |
वार्षिक वाढ |
एकूण महसूल | 13.44 | 7.93 | 69.48% | 12.53 | 6.72 | 86.46% |
एबिट्डा | 10.23 | 5.80 | 76.38% | 9.34 | 4.61 | 102.60% |
एबिट्डा (%) | 76.12 | 73.14 | 298 Bps | 74.54 | 68.60 | 594 Bps |
पीएटी | 8.15 | 4.71 | 73.04% | 7.41 | 3.75 | 97.60% |
पीएटी (%) | 60.64 | 59.39 | 125 Bps | 59.14 | 55.80 | 333 Bps |
इपीएस (रु.) | 4.23 | 2.44 | 73.36% | 3.84 | 1.93 | 98.96% |
कंपनीच्या या कामगिरीविषयी बोलताना इको रिसायकलिंग लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. के. सोनी म्हणाले, “या तिमाहीत आमची कामगिरी हा जबाबदार रिसायकलींगचा स्वीकार आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीचा परिणाम आहे. वरील बाबी लक्षात घेऊन आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक केली आहे आणि नावीन्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्याची संस्कृती जोपासली आहे. यामुळे आम्ही ऑफर करत असलेल्या सेवांचा विस्तार करणे, आमची कार्यक्षमता वाढविणे आणि उच्च नफा मिळवणे शक्य झाले आहे. आमचा असा विश्वास आहे की पुनर्वापर हा परिभ्रमणाचा पाया आहे आणि आमचे प्रयत्न पीआयएल योजनेच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मौल्यवान आणि दुर्मिळ धातूंच्या सुरक्षिततेसाठी थेट योगदान देतात. सरकारच्या ईपीआर फ्रेमवर्कसह आमच्या ऑपरेशन्सचे संरेखन जागतिक ब्रँड्ससाठी त्यांच्या टिकाऊ उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी एक प्रमुख भागीदार म्हणून आमची भूमिका अधिक मजबूत करते.
महसूल आणि नफ्यातील वार्षिक वाढ आमच्या धोरणात्मक उपक्रमांची प्रभावीता आणि मूल्य प्रदान करण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते. जसजसे आम्ही पुढे जात आहोत, तसतसे आम्हाला विश्वास आहे की ई-कचरा व्यवस्थापनासाठी आमचा सर्वसमावेशक दृष्टिकोन आमच्या ग्राहकांसाठी आणि पर्यावरणासाठी सकारात्मक परिणाम निर्माण करत राहील.” |