- एकूण इश्यू आकार – प्रत्येकी १० रूपयांचे ४५,६४,००० इक्विटी शेअर्स
- इश्यू आकार – २६,४७ कोटी रूपये (अपर बँडमध्ये)
- किंमत बँड – प्रतिशेअर ५५ रूपये ते ५८ रूपये
- लॉट आकार – २,००० इक्विटी शेअर्स
NHI NEWS AGENCY – एस्थेटिक इंजीनिअर्स लिमिटेड (एईएल, कंपनी) ही फॅकेड सिस्टम्सची डिझाइन, रचना, फॅब्रिकेशन व इन्स्टॉलेशनमधील आघाडीची कंपनी आहे, जी बिल्डिंग फॅकेड्स (इमारतींचे दर्शनी भाग), अॅल्युमिनिअम दरवाजे व खिडक्या, रेलिंग्ज, स्टेअरकेसेस् आणि ग्लासफायबर रिइन्फोर्स काँक्रीट (जीएफआरसी) अशी उत्पादने देते. एस्थेटिक इंजीनिअर्स लिमिटेडने ८ ऑगस्ट २०२४ रोजी इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ)सह सार्वजनिक होण्याच्या आपल्या योजनेची घोषणा केली आहे, जेथे एनएसईच्या इमर्ज प्लॅटफॉर्मवर ४५,६४,००० इक्विटी शेअर्स जारी करण्याचा मनसुबा आहे;
इश्यू प्रत्येकी १० रूपयांच्या दर्शनी किमतीवर जवळपास ४५,६४,००० इक्विटी शेअर्स आहे.
इक्विटी शेअरचे वाटप
- क्यूआयबी (अँकर गुंतवणूकदार वगळून) – ८,६६,००० इक्विटी शेअर्सहून अधिक नाही.
- अँकर गुंतवणूकदार भाग – १२,९६,००० हून अधिक नाही.
- नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) – ६,५२,००० इक्विटी शेअर्सपेक्षा कमी नाही.
- रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स (आरआयआय) – १५,१८,००० इक्विटी शेअर्सपेक्षा कमी नाही.
- मार्केट मेकर – जवळपास २,३२,००० इक्विटी शेअर्स.
इश्यूमधून मिळणारे निव्वळ उत्पन्न प्रामुख्याने कंपनीच्या भांडवली खर्चासाठी, तसेच कंपनीच्या कार्यरत भांडवल आवश्यकता आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येईल. अँकर भागासाठी बोली ७ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू होईल. इश्यू सदस्यत्वासाठी ८ ऑगस्ट २०२४ रोजी खुला होईल आणि १२ ऑगस्ट २०२४ रोजी बंद होईल.
या इश्यूसाठी लीड मॅनेजर नार्नोलिया फायनान्शियल सर्विस लिमिटेड आहे. इश्यूची रजिस्ट्रार स्कायलाइन फायनान्शियल सर्विसेस् प्रायव्हेट लिमिटेड आहे.
एस्थेटिक इंजीनिअर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अविनाश अग्रवाल म्हणाले, ”आम्हाला एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर आमच्या आगामी आयपीओची घोषणा करताना आनंद होत आहे. या इश्यूमधून मिळणारे उत्पन्न कंपनीच्या भांडवल खर्च गरजांची, तसेच आमच्या कार्यरत भांडवल गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांची पूर्तता करण्यासाठी धोरणात्मकरित्या वापरण्यात येईल.”
नार्नोलिया फायनान्शियल सर्विसेस् लिमिटेडच्या मर्चंट बँकिंग डिव्हिजनचे कार्यकारी संचालक श्री. पंकज पासी म्हणाले, ”आम्हाला एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर एस्थेटिक इंजीनिअर्सच्या आयपीओचे लीड मॅनेजर असण्याचा आनंद होत आहेत. कंपनी आदरातिथ्य, निवासी, व्यावसायिक व पायाभूत सुविधा प्रकल्प अशा विविध उद्योगांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उत्पादने व सेवांची व्यापक श्रेणी देते. मार्केट ट्रेण्ड्स पाहता आम्ही एस्थेटिक इंजीनिअर्सला यशस्वी लिस्टिंगसाठी शुभेच्छा देतो.”