बेस्टची पंचाहत्तरी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पार्श्वभूमीवर फक्त १ रुपयात प्रवास ही योजना बेस्ट उपक्रमाने जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत चलो अॅपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा बसपास केवळ एक रुपयांत डाऊनलोड करता येईल. ज्यामध्ये त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बसमध्ये सात दिवसांत कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत स्मार्ट कार्डवर सुद्धा २० रुपयांची सवलत मिळेल, सध्याच्या 33 लाख दैनंदिन प्रवाशांपैकी २२ लाख प्रवासी चलो अॅपचा वापर करतात आणि ३.५ लाख प्रवासी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करतात. सदर सवलत दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहील.