• 10/- फेस व्हॅल्यू रुपये असलेल्या प्रत्येक समभागासाठी प्राईस बँड रु. 72/- ते रु. 76/- दरम्यान राहील.
• बिड/ऑफर खुली होण्याची तारीख – शुक्रवार दि. 02 ऑगस्ट 2024 तर ऑफर बंद होण्याची तारीख मंगळवार दि. 06 ऑगस्ट 2024.
• किमान बिड लॉट 195 समभाग व त्यापुढे 195 समभागांच्या पटीत.
• फ्लोअर प्राईस समभागाच्या फेस व्हॅल्यूच्या 7.2 पट आणि कॅप प्राईस समभागाच्या फेसव्हॅल्यूच्या 7.6 पट.
NHI – AGENCY NEWS
मुंबई, : बेंगळुरु स्थित ओला इलेक्ट्रीक मोबीलीटी लिमिटेड कंपनी ही पूर्णपणे इव्ही अर्थात इलेक्ट्रीक वाहनांचा व्यवसाय असलेली कंपनी आहे. ही कंपनी आपल्या इलेक्ट्रीक वाहने व त्या वाहनांचे सुटे भाग निर्मिती व त्यांचे एकात्मिक तंत्रज्ञान उभे करीत आहे. कंपनीने त्यासाठी आयपीओ अर्थात खुली समभाग विक्री येत्या शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 पासून सुरु करण्याची घोषणा केली आहे. कंपनीची ही आयपीओ ऑफर मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी बंद होईल. 10/- फेस व्हॅल्यू रुपये असलेल्या प्रत्येक समभागासाठी. कंपनीने विक्रीस काढलेल्या समभागांसाठी प्राईस बँड रु. 72/- ते रु. 76/- दरम्यान असेल असे जाहीर केले आहे. गुंतवणूकदार किमान 195 समभागांच्या लॉट साठी तसेच त्यापुढे 195 समभागांच्या पटीत समभाग खरेदीसाठी बिड करु शकतील असे कंपनीने जाहीर केले आहे.
आयपीओमध्ये एकूण 55,000 दशलक्ष फ्रेश इक्विटी शेअरचा समावेश आहे, तसेच प्रमोटर आणि गुंतवणूकदार शेअरहोल्डर यांच्याकडून ऑफर ऑफ सेल अंतर्गत (ओएसएफ) 84,941,997 समभाग विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच या आयपीओ ऑफर मध्ये अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांसाठी काही प्रमाणात समभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.
आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स कोटक महिंद्र कॅपिटल कंपनी लिमिटेड, सीटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रा. लिमिटेड, बीओएफए सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, गोल्डमॅन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरीटीज लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केटस लिमिटेड, आणि बीओबी कॅपिटल् मार्केटस लिमिटेड याकंपन्यांचा समावेश आहे. तसेच आयपीओ रजिस्ट्रार म्हणून लींक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम पाहात आहे. ओला इलेक्ट्रीक मोबीलीटी कंपनीचे समभाग बीएसई व एनएसई या देशातील प्रमुख शेअरबाजारांमध्ये सूचीबध्द करण्यात येणार आहेत.
कंपनीची आयपीओ ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून देउ करण्यात आली आहे. विक्रीस काढलेल्या एकूण समभागांपैकी 75 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग मान्यताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच 15 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग बिगर संस्थात्मक गुंतणूकदारांसाठी उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एकूण ऑफरपैकी १० टक्क्यांपेक्षा अधिक समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत.