NHI NEWS AGENCY
मुंबई : देशातील 10 राज्यात 34 प्रकल्प झपाट्याने पूर्ण केलेली पायाभूत बांधकाम क्षेत्रातील सीगल इंडिया लिमिटेड कंपनी गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून आयपीओ विक्री सुरु करीत आहे. कंपनीची ही आयपीओ विक्री सोमवार दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी बंद होईल. कंपनीने फेस व्हॅल्य प्रत्येकी रु. 5 असलेल्या प्रत्येक समभागासाठी रु. 380/- ते रु. 401/- दरम्यान प्राईसबँड निश्चित केला आहे. गुंतवणूकदार किमान 37 समभागांसाठी बिड करु शकणार आहेत, व त्यापुढे 37 समभागांच्या पटीत बिड करु शकणार आहेत. सिगल इंडिया लिमिटेड कंपनीकडे एलिव्हेटेड रोड, फ्लायओव्हर, सेतु, रेल्वे ओव्हरब्रीज, टनेल, हायवे, मेट्रा, एक्सप्रेसवेज, आणि रनवेज यांचे बांधकाम करण्यात विशेष प्राविण्य आहे.
आयपीओमध्ये रु. 6842.52 दशलक्ष मूल्याच्या फ्रेश इश्यूचा तर ऑफर फॉर सेल अंतर्गत समभाग विक्रेत प्रमोटर व समभाग विक्रेत समभागधारक यांच्याकडून 1,41,74,840 पर्यंत समभाग उपलब्ध करण्यात येणार आहेत.
फ्रेश इश्यूतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकही 997.89 दशलक्ष रुपये उपकरण खरेदीसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच रु. 4,134 दशलक्ष काही कर्जांची पूर्णता अथवा अंशता परतफेड किंवा मुदतपूर्व फेड करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ही कर्जे कंपनीने व कंपनीच्या सीआयपीपीएल या उपकंपनीद्वारा घेण्यात आली होती. तसेच आयपीओ उत्पन्नापैकी काही भाग सामान्य कार्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहे. सीगल इंडिया लिमिटेड कंपनी अत्यंत वेगाने वाढणारी इंजिनिअरींग प्रॉक्युरमेंट तसेच कंस्ट्रक्शन अर्थात इपीसी कंपनी आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 पर्यंत तीन वर्षात सालागणिक वार्षिक रु. 10,000 दशलक्ष उलाढाल असलेल्या कंपन्यांत स्थान मिळवले आहे. कंपनीकडे मागील 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 2024 आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या कंपन्या स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत सालागणिक 43.10 टक्के सर्वाधिक महसूल वाढ साध्य केली आहे.
आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान कंपनीने सालागणिक 50.13 टक्के दराने वाढ साध्य केली आहे. मागील दोन दशकात कंपनीने एक छोट्या बांधकाम कंपनीपासून एक प्रस्थापित इपीसी कंपनी होण्यापर्यंत प्रगती साध्य केली आहे. या दरम्यान कंपनीने विविध प्रकारचे रस्ते व हायवे प्रकल्पांचे डिझाईन व बांधकाम करुन आपले प्राविण्य सिद्ध केले आहे. तसेच कंपनीने देशातील दहा राज्यांत विशेष प्रकल्प तडीस नेले असल्याची माहिती सीएआरई च्या अहवालात देण्यात आली आहे.
लुधियाणायेथील या कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने इपीसी प्रोजेक्ट व हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल असा विभागला असून देशातील दहा राज्यात विस्तारला आहे. 30 जून 2024 च्या आकडेवारीनुसार कंपनीकडे रु. 94,708.42 दशलक्ष मूल्याच्या ऑर्डर हाती आहेत.
कंपनीने एकूण 34 प्रकल्प पूर्ण केले असून त्यात 16 इपीसी, 1 एचएएम, 5 ओ अँड एम, आणि 12 आयटेम रेट प्रकल्पांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प रस्ते व हायवे बांधकाम क्षेत्रातील आहेत. सध्या कंपनीचे 18 प्रकल्प सुरु त्यात 13 इपीसी आणि 5 एचएएम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांत एलीव्हेटेड कॉरिडॉर्स, सेतू, उड्डाणपूल, रेल्वे ओव्हरब्रीज, टनेल, एक्सप्रेसवे, रनवे, मेट्रो प्रकल्प व बहुबदरी हायवे मार्ग प्रकल्पांचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये सीगल इंडियाने 20681.68 दशलक्ष रुपये महसूल प्रचालनातून मिळवला होता. तर 2024 साली या कंपनीने तब्बल 46.48 टक्के वाढीने 30293.52 दशलक्ष रुपये प्रचालन महसूल मिळवला आहे. महसूलातील ही वाढ प्रामुख्याने बांधकाम कंत्राटातील महसूल, सामान विक्री व फायनान्स ॲसेट विक्रीमधील उत्पन्न वाढीमुळे शक्य झाली आहे. तसेच कंपनीने याच 2024 साली 3043.07 दशलक्ष नफा कमावला आहे. 2023 साली कंपनीने 1671.72 दशलक्ष रुपये नफा कमावला होता.
आयसीआयसीआय सिक्युरीटीज लिमिटेड, आयआयएफएल लिमिटेड, आणि जेएम फायनान्शिअल लिमिटेड कंपन्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत तर लींक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहात आहे. कंपनीचे समभाग बीएसई व एनएसई शेअरबाजारांमध्ये सूचीबद्ध करण्यात येणार आहेत.
आयपीओ ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रीयेतून देण्यात येत आहे. यात मान्यताप्राप्त संस्थांत्मक गुंतणूकदारांसाठी 50 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच 15 टक्क्यांपेक्षया कमी समभाग बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करण्यात येणार नाहीत. त्याचप्रमाणे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत.