30 जून 2024 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे निकाल
§ Q1 FY2025 महसूल RS. 46,980 Mn; 21% वार्षिक वाढ
§ Q1 FY2025 EBITDA RS. 5,834 Mn; 6% वार्षिक वाढ
§ Q1 FY2025PAT RS. 4,016 Mn; -0.4% वार्षिक घसरण
मुंबई, : पॉलीकॅब इंडिया लिमिटेड (BSE: 542652, NSE: POLYCAB) ने 30 जून 2024 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.
कामगिरीबद्दल भाष्य करताना, पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. इंदर टी. जयसिंघानी म्हणाले: “आम्ही आर्थिक वर्षाची सुरुवात मजबुतीने केली आहे, ज्या अंतर्गत आम्ही आमच्या इतिहासातील सर्वाधिक पहिल्या तिमाहीतील उत्पन्न मिळवले आहे, जरी तिमाहीच्या उत्तरार्धात कमोडिटी किमतीतील अस्थिरतेमुळे चॅनेल विक्रीवर परिणाम झाला असला तरी. बदलत्या बाजार वातावरणात आमची अपवादात्मक अंमलबजावणी क्षमता आणि अनुकूलता यामुळे अधोरेखित होते. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या उद्देशाने केलेल्या संरचनात्मक सुधारणांमुळे देशांतर्गत मजबूत अर्थव्यवस्था तर होतेच, पण सोबतच आमच्या विविध उत्पादन श्रेणींच्या वाढीसाठी फायदेशीर पार्श्वभूमीही निर्माण होते. सतत मजबूत मागणीचा आमचा अंदाज असल्याने, आम्ही या महत्त्वपूर्ण संधींचा लाभ घेण्यासाठी आणि शाश्वत वाढीसाठी पूर्णपणे तयार आहोत.”
प्रमुख मुद्दे (Q1 FY25)
W&C व्यवसायातील स्थिर वाढ, EPC व्यवसायातील भक्कम वाढ आणि FMEG व्यवसायाची सीझनमधील दमदार कामगिरीच्या आधारे कंपनीच्या महसुलात वार्षिक 21% वाढ झाली आहे.
Q1 FY2025 साठी W&C व्यवसाय महसुलात वार्षिक 11% वाढ होऊन तो RS. 38,572 दशलक्ष झाला. उत्पादनांच्या किमतीतील लक्षणीय चढ–उतारांमुळे तिमाहीच्या उत्तरार्धात विक्रीच्या मागणीवर तीव्र परिणाम झाला, यामुळे उत्पादनांच्या सरासरी किमतींमधून मिळणारे संभाव्य फायदे कमी झाले. मात्र, आता वस्तूंच्या किमती स्थिर झाल्यामुळे, तसेच चॅनल इन्व्हेंटरी सामान्य असल्याने, आगामी तिमाहीतही विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. देशांतर्गत व्यवसायाचा विचार करता, संस्थात्मक व्यवसायाने वितरण व्यवसायाला मागे टाकले, तर केबल्समध्ये वाढ झाल्याने वायर्सच्या तुलनेत त्यांची कामगिरी सरस होती. या तिमाहीत आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल कमी झाला आणि या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित महसुलात त्याचे योगदान 5.3% आहे. तिमाहीसाठी EBIT मार्जिन 12.6% होते. मात्र, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वितरण व्यवसायांच्या कमी योगदानामुळे विपरित परिणाम झाला.
देशातील अनेक भागांत उष्णतेची लाट असल्याने पंख्यांच्या जोरदार विक्रीमुळे FMEG व्यवसायाने वर्षभरात 21% ची वाढ नोंदवली. मजबूत रिअल इस्टेट मागणीमुळे आमचे स्विचेस, स्विचगीयर्स, कंड्युट पाइप्स आणि फिटिंग्ज सेगमेंटने मजबूत वाढ दर्शविली, तर लाइट्स आणि ल्युमिनेअर्स विभागामध्ये आव्हाने कायम राहिली, ज्यामुळे उद्योग स्तरावर किमती कमी होत गेल्या. स्विचगीयर्स आणि कंड्युट पाइप्स आणि फिटिंग्जच्या वर्धित योगदानासह कमी A&P खर्चामुळे तिमाही दरम्यान EBIT मार्जिन सुधारले.
मुख्यत्वे EPC व्यवसायाचा समावेश असलेल्या इतर व्यवसायांनी या तिमाहीत 292% ची मजबूत वाढ नोंदवत RS. 4,815 Mn एवढा महसूल कमावला. यासाठी प्रमुख कारण ठरले ते EPC ऑर्डर बुकची मजबूत अंमलबजावणी. कंपनीच्या एकत्रित महसुलात या व्यवसायाचे योगदान मध्य ते उच्च एकल अंकांमध्ये असणे अपेक्षित आहे.
· तिमाहीसाठी EBITDA मार्जिन 12.4% एवढा होता. आमच्या विविध व्यवसायांमध्ये कमी मार्जिन असलेल्या विभागांमध्ये बदल झाल्यामुळे विपरित परिणाम झाला. विशेषतः उच्च–मार्जिन असलेला आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि देशांतर्गत वितरण व्यवसायाला कमी वाव मिळाला, तर कमी–मार्जिन EPC व्यवसायातील योगदान वाढले.
· आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत PAT 0.4% ने घटला आणि ₹ 4,016 Mn एवढा झाला. या तिमाहीत PAT मार्जिन 8.5% एवढे होते.
· 30 जून 2024 पर्यंत निव्वळ रोख स्थिती RS. 16.4 अब्ज आहे, जी मागील वर्षी याच तिमाहीत RS. 10.1 अब्ज होती.
· 16 जुलै 2024 रोजी कंपनीच्या 28 व्या एजीएममध्ये भागधारकाची मंजुरी मिळाल्यानंतर, कंपनीने त्याच दिवशी तिच्या भागधारकांना प्रति शेअर RS. 30 चा लाभांश मंजूर केला.
· कंपनीने तिची लेखापरीक्षा समिती, तसेच नॉमिनेशन आणि रेम्युनरेशन समितीची तत्काळ प्रभावाने पुनर्रचना केली आहे. या दोन्ही समित्यांमध्ये पूर्णपणे स्वतंत्र संचालकांचा समावेश असेल.