मुंबई: NHI news agency.
दिनांक ०७.०७.२०२४ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कुर्ला विधानसभेत, मेश्राम फाउंडेशनच्या सौजन्याने विविधशासकीय योजनांचे एकूण आठ शाखांमध्ये भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते.
स्थानिकांच्या सुविधेसाठी लोकउपयोगी योजना, माझी लाडकी बहीण योजना, जेष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान कार्ड, ईश्रम कार्ड, आभा कार्ड, वोटर कार्ड रेजिस्ट्रेशन, विधवा पेन्शन कार्ड, आधार कार्ड लिंकिंग, मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी ह्या लोकाभिमुख सेवांचे विनामूल्य आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते.
कुर्ला विधानसभे अंतर्गत शिवसेना शाखा क्रमांक १४९, १५१, १६५, १६७, १६८, १६९, १७०, १७१, येथे सदर शिबिरांचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. स्थानिकांनी प्रचंड उत्साहात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ह्या सेवांचा लाभ घेतला. तसेच मेश्राम फाउंडेशनतर्फे स्थानिकांच्या सोयीसाठी दररोज प्रत्येक शाखेत संध्याकाळी सात ते नऊ ह्या वेळेत वरील नमूद सेवा प्रदान केल्या जाणार आहेत.नागरिकांना आवाहन आहे कि त्यांनी ह्या विनामूल्य सेवांचा अवश्य लाभ घ्यावा.
सदर शिबिरांची संकल्पना आणि मार्गदर्शन शिवसेना विभाग प्रमुख, विभाग क्रमांक ६, कुर्ला कालीना विधानसभा माननीय डॉक्टर महेश पेडणेकर यांच्या मुळे शक्य झाले.
शाखा प्रमुख श्री. दिलप मोरे, श्री. पंढरीनाथ आंबेडकर, श्री. बाबुराव मोरे, श्री. विजय मांढरे, श्री शशांक नाईक, श्री. मानसिंग कापसे, श्री विशाल बिलये, श्री. सुधीर भोसले यांनी तसेच प्रत्येकशाखेच्या महिला व पुरुषपदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सदर शिबिरांचे यशस्वीरीत्या आयोजन केले.