MUMBAI:
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिन-२० जुलैपासून होणाऱ्या स्व. सौ. मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक शालेय मुलामुलींच्या आणि खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुध्दिबळपटूसह १०६ खेळाडूंमध्ये चुरस असेल. को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई आणि युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांच्यावतीने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ३० रोख व ७५ चषक पुरस्कार दिले जाणार आहेत. २० व २१ जुलै दरम्यान ही स्पर्धा आरएमएमएस वातानुकुलीन हॉल, परेल, मुंबई-१२ येथे रंगणार आहे.
आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने शालेय मुलामुलींची ८/१०/१२ वर्षाखालील वयोगटाची बुध्दिबळ स्पर्धा २० जुलै रोजी तर अंतिम विजेतेपदाचा रोख रुपये दहा हजारसह स्व. सौ. मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक पटकाविण्यासाठी खुली जलद बुध्दिबळ स्पर्धा २१ जुलै रोजी स्विस लीग पध्दतीने होणार आहे. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत. बुध्दिबळपटूंच्या आग्रहास्तव स्पर्धा प्रवेश अर्जाची मुदत १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असून संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे संपर्क साधावा.
******************************