~ अश्विन शेठ समूह साजरा करत आहे बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील ३८ वर्षांची परंपरा
~अश्विन शेठ समूहाने आर्थिक वर्ष २२–२३ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२३–२४ मध्ये तिपटीने वाढ करत मिळविला १,४८६ कोटी रु. चा विक्री महसूल
~अश्विन शेठ समूहाची एमएमआर प्रदेशात आपला व्यवसाय पोर्टफोलिओ विस्तारण्याची योजना असून बंगळुरू, दिल्ली (NCR) मध्ये प्रवेश करत आहे, तसेच हैदराबाद, चेन्नई आणि गोव्यात प्रवेश करण्याची योजना आखली आहे.
~ पुढील ३ ते ५ वर्षांमध्ये शाश्वतता आणि हरित उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कर
NHI NEWS AGENCY
ANAGHA SAKPAL
मुंबई,- एमएमआर प्रदेशातील आलिशान बांधकाम क्षेत्र बाजारपेठेतील सुप्रसिद्ध नाव अश्विन शेठ समूहाने तिप्पट वाढ आणि इतर प्रमुख महानगरांमध्ये नियोजित प्रवेश करण्याची योजना आखत आपली ३८ वर्षांची समृद्ध परंपरा साजरी करण्यासाठी रीब्रँडिंग उपक्रमाची अभिमानाने घोषणा केली आहे. नवीन लोगो आणि व्हिजनचे अनावरण करून, अश्विन शेठ समूहाने ग्राहकांचे जीवनमान उंचाविण्याच्या आपल्या बांधिलकीचा आणि गुणवत्ता व रचना यांच्याप्रति असलेल्या त्यांच्या दृढ समर्पणाचा पुनरुच्चार केला.
अश्विन शेठ समूहाने नवीन ब्रँड ओळखीसाठी क्लोरोफिल या भारतातील पहिल्या एंड–टू–एंड ब्रँड कन्सल्टन्सी फर्मसोबत एकत्रीकरण केले. नवीन लोगोमध्ये ‘A’ आणि ‘S’ अक्षरे आहेत, जी अश्विन शेठ ग्रुपच्या हितचिंतक भागधारकांना ते कशाप्रकारे वसलेल्या जगाचे क्षेत्र आरशाप्रमाणे प्रतिबिंबित करतात, ते दर्शवितात. “आमचे जग प्रतिबिंबित करते तुमचे जग” ही टॅगलाइन ग्राहकांच्या इच्छा, गरजा आणि आकांक्षा समजून घेण्याचे आणि पूर्ण करण्याचा समर्पित भाव स्पष्टपणे व्यक्त करते.
अश्विन शेठ ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अश्विन शेठ म्हणाले, “भारताची बांधकाम व्यवसाय क्षेत्र बाजारपेठ दीर्घकाळापासून आर्थिक वाढीची प्रमुख चालक राहिली असून, देशाच्या जीडीपीमध्ये हे क्षेत्र लक्षणीय योगदान देत आहे. मुंबई लक्झरी मार्केटमध्ये आघाडीवर असल्याने आणि रिअल इस्टेट उद्योगाला सकारात्मक गती येत असल्यामुळे पुढच्या स्तरावर जाण्यासाठीची हीच योग्य वेळ आहे, हे आम्ही ठरवले. रीब्रँडिंगने आमच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यातून आमच्या ग्राहकांच्या आकांक्षा खोलवर रुजण्यास जागा निर्माण करण्याची आमची बांधिलकी प्रतिबिंबित होते. आर्थिक वर्ष २३–२४ मध्ये १,४८६ कोटी रु. पर्यंत पोहोचलेली विक्री आणि लक्षणीय तीन पट विकासाचा आलेख यांच्या साथीने आमचे आर्थिक वर्ष २३–२४ उल्लेखनीय ठरले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढचा विचार करताना नावीन्यपूर्णता, शाश्वतता आणि विस्तृत समाज बांधणी यांच्या माध्यमातून नागरी जीवनाची पुनर्व्याख्या करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. नवा दृष्टिकोन आणि ब्रँड ओळख यांसह माझी टीम याला अश्विन शेठ २.० म्हणत आहे.”
अश्विन शेठ ग्रुपचे मुख्य जन आणि प्रक्रिया अधिकारी श्री प्रभाकर आझाद म्हणाले, “कर्मचारी केंद्रित दृष्टिकोनाप्रति असलेली आमची बांधिलकी आणि खोलवर रुजलेली मूल्ये आमच्या कंपनीच्या यशाचा पाया आहेत. SAP, HONO, Smart APP आणि SFDC एकत्र करून, आम्ही आमच्या कामकाज कार्यक्षमतांमध्ये परिवर्तन करत आहोत आणि तंत्रज्ञानावर चालणारी कंपनी या नात्याने ग्राहकांच्या अपेक्षापूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. आर्थिक वर्ष २३–२४ मध्ये, अश्विन शेठ ग्रुपला त्यांच्या वेतन चक्रासाठी सर्वाधिक पसंतीच्या कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखले गेले. आमचा नेतृत्व कार्यसंघ कौशल्य आणि उद्योग–अग्रणी व्यवसाय पद्धतींमध्ये मापदंड प्रस्थापित करेल, याची खात्री करून, आम्ही उद्योगातील आघाडीचे कौशल्य आकर्षित करण्यास आणि त्यांना कामावर नियुक्त करून घेण्यास समर्पित आहोत. जागतिक दर्जाच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि आमच्या उत्कृष्ट प्रतिभेसाठी अतुलनीय विकास संधी सादर करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. त्यामुळे आम्हाला अधिक उंची गाठण्यात मदत होईल.”
अश्विन शेठ ग्रुपचे मुख्य विक्री आणि विपणन अधिकारी श्री. भाविक भंडारी म्हणाले, “नाविन्याच्या उत्कट प्रेरणेने अश्विन शेठ ग्रुपने सखोल संदर्भ समजातून आरामशीर, अलिशान गोष्टीची पुर्नव्याख्या केली आहे. विस्ताराच्या भविष्यातील प्रवासाला सुरुवात करताना, अश्विन शेठ 2.0 चा अर्थ आम्ही तुम्हाला केवळ घर देणार असे नाही तर तुमच्या इच्छा, गरजा आणि आकांक्षा समजून घेणार. आम्ही संपूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये आक्रमकपणे विस्तार करत आहोत आणि आम्ही लवकरच कांदिवली, बोरिवली, शिवडी, जुहू, 7 रास्ता, मरीन ड्राइव्ह, नेपियन सी रोड, गोरेगाव, ठाणे, मुलुंड आणि माझगाव येथे प्रकल्प सुरू करणार आहोत. आम्ही लवकरच बंगलोर, पुणे, दिल्ली (एनसीआर), चेन्नई, हैदराबाद आणि गोवा या शहरांमध्ये प्रवेश करणार आहोत. प्रमुख स्थाने, काटेकोर नियोजन, नाविन्यपूर्ण डिझाईन आणि अतुलनीय गुणवत्ता यावर आमचे अखंड लक्ष केंद्रित आहे. आमचे रीब्रँडिंग हे केवळ एका नवीन ओळखीपेक्षा जास्त आहे. सर्वांगीण जीवनशैलीची रचना करण्याप्रती असलेली आमची बांधिलकी यातून दिसून येते. आमच्या ग्राहकांची आकांक्षा यातून प्रतिबिंबित होते. नाविन्याच्या आणि विकासाच्या मार्गावरून पुढे वाटचाल करत असताना आम्ही अतुलनीय मूल्य आणि विलक्षण अनुभव देण्यासाठी तयार आहोत. बांधकाम व्यवसाय क्षेत्राच्या बाजारपेठेतील आमचे अग्रणी स्थान यामुळे आणखी मजबूत होत आहे. सीएमडी दृष्टिकोन आणि व्यवसाय विस्तार यांचा एक भाग म्हणून आगामी ४–५ वर्षात भारतातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील आघाडीच्या १० कंपन्यांपैकी एक बनण्याची कंपनीची योजना आहे.”
या नवीन ब्रॅंड ओळखीबद्दल बोलताना क्लोरोफिल ब्रॅंड अँड कम्युनिकेशन कन्सल्टन्सीचे सह संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. किरण खालप म्हणाले, “भारतातील बांधकाम व्यवसाय क्षेत्र हे भारतभरात कार्यरत अशा मोजक्या ब्रॅंडनी वैशिष्टकृत आहे. अश्विन शेठ ग्रुपची आकांक्षा ही त्यांच्यापैकी एक बनण्याची असल्यामुळे संपूर्ण भारतभरातील मानसिकता समजून घेण्यासाठी क्लोरोफिलला त्यांच्या व्यापक, सखोल प्रक्रियेचा (ideantity™) उपयोग करून घेण्याची गरज होती. यातून विस्मयजनक माहिती पुढे आली. खऱ्याखुऱ्या आलिशान गोष्टींमध्ये खरेदीदारांच्या गरजा खऱ्या अर्थाने समजून घेणे समाविष्ट असते. आणि त्यामध्ये अश्विन शेठ ग्रुप सर्वोत्तम आहे. त्यातून ब्रॅंडचा अर्थ “आमचे जग प्रतिबिंबित करते तुमचे जग” या टॅगलाइनसह सुंदर व्हिज्युअल (जिथे A आणि S या मिरर इमेज होत्या) मधून दाखवता आला. मानवी स्मरणशक्ती या भूतलावरील सर्वाधिक महाग बांधकाम क्षेत्रात जागा मिळविण्यासाठीचा ideantity™ हा सर्वात वेगवान मार्ग आहे यावर आमचा विश्वास आहे!”
मोक्याच्या ठिकाणी नवीन भूसंपादनासह नवीन विकास घटकांकडे लक्ष देण्याची कंपनीची योजना आहे. यामध्ये संयुक्त उपक्रम, पुनर्विकास आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असेल. कंपनी आपला उत्पादन पोर्टफोलिओ निवासी, व्यावसायिक, टाउनशिप, व्हिलाज, रिटेल, मिक्स–यूज, फार्म–हाउसेस, को–वर्किंग स्पेसेस, सेकंड होम्स आणि वेअरहाउसिंग मध्ये विस्तारत आहे.
महत्त्वाकांक्षी विस्तार योजना, चांगले शाश्वत उपक्रम आणि आगामी आयपीओच्या शक्यतेसह, एएसजी भारतीय बांधकाम क्षेत्र व्यवसायामध्ये आपला वारसा उंचावण्यास सज्ज आहे.