लग्न झालेल्या पुरुषामागे साडेसाती लागल्यावर त्याला वाघाचं डॉगी बनायला वेळ लागत नाही !! अवघड पडलंय आता हे कोडं, स्वर्गातल्या गाठींनी पार केलंय वेडं. ‘बाई गं’ चित्रपटाचं गाणं “वाघाचा डॉगी” हे आपल्या भेटीला
प्रत्येक कपल ची लव्ह स्टोरी खास असते पण जेव्हा त्या लव्ह स्टोरी मध्ये एखादी बायको रुसते तेव्हा नवऱ्याला दिवसात पण तारे दिसतात ह्यात काही शंका नाही.
“वाघाचा डॉगी” ह्या गाण्यात सुद्धा अभिनेता स्वप्नील जोशी ची हालत अशीच काहीशी झाली आहे. लग्ना नंतरच्या रुसवा रुसवी नंतर एकाद्या नवरायची कशी तरा होते हे ह्या गाण्यात आपण पाहू शकतो. बसल्या जागी तो बिचारा पूर्णपणे फसलाय. “वाघाचा डॉगी” ह्या गाण्यात परदेशातल्या मुली चक्क मराठी गाण्यावर आपले पाय थिरकवताना दिसत आहे. गाण्याचं म्युसिक इतकं कमालीचं आहे कि प्रेक्षकांना वेड लावेल इतकच नव्हे तर ह्या गाण्याचं हूक्सटेप सुद्धा फार युनिक आहे.
जय अत्रे ह्यांनी लिहिलेलें हे गाणं नकाश अझीझ आणि वृषा दत्ता ह्यांनी गायलं आहे. वरून लिखाते ह्यांनी या गाण्याला संगीत देण्या बरोबरच इंग्लिश लिरिक्स सुद्धा लिहिले आहेत
‘ बाई गं’ या
चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत इतर कलाकार जसे प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.
नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ हा चित्रपट १२ जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.